munotes®

HSC Economics March 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Economics-March-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J-184 · 8 pages · 87 KB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 30 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) सहसंबंध पूर्ण करा :
    • (i) सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत : : स्थूल अर्थशास्त्र : …
    • (ii) किंमत वाढ : … : : किंमत घट : पुरवठा संकोच
    • (iii) मीठ : जीवनावश्यक वस्तू : : हिरा : …
    • (iv) … : मूळ वर्षाची किंमत : : P1 : चालू वर्षातील किंमत
    • (v) नाणे बाजार : अल्पकालीन निधी : : … : दीर्घकालीन निधी
    Read the model answer
  2. (B) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा :
    • (i) वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता.
    • (ii) अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा.
    • (iii) स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च.
    • (iv) वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च.
    • (v) सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक.
    Read the model answer
  3. (C) विसंगत शब्द ओळखा :
    • (i) उपयोगितेचे प्रकार : स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता
    • (ii) पुरवठा नियमाचे अपवाद : गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू, दुर्मीळ वस्तू
    • (iii) विक्री खर्च : मोफत भेट वस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन
    • (iv) मागणीचे निर्धारक घटक : उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत
    • (v) निर्देशांकांचे प्रकार : निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक
    Read the model answer
  4. (D) योग्य पर्याय निवडा :
    • (i) 'य' अक्षास समांतर असणारा मागणी वक्र : (अ) संपूर्ण अलवचीक मागणी (ब) कमी लवचीक मागणी (क) संपूर्ण लवचीक मागणी (ड) एकक लवचीक मागणी. पर्याय : (1) क, ड (2) ब, ड (3) अ, ब, क (4) फक्त अ
    • (ii) प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम : (अ) सीमांत प्राप्ती (ब) सीमांत खर्च (क) सरासरी प्राप्ती (ड) एकूण प्राप्ती. पर्याय : (1) अ, ब, क (2) अ, क, ड (3) फक्त क (4) फक्त ब
    • (iii) किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा : (अ) निर्देशांक हे भौगोलिक साधन आहे. (ब) हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. (क) आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. (ड) निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय : (1) क, ड (2) अ, ब (3) ब, क (4) अ, ब, क, ड
    • (iv) सरकारच्या अनिवार्य कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो : (अ) रोजगार निर्मिती (ब) अंतर्गत कायदा व सुव्यवस्था (क) कल्याणकारी उपाययोजना (ड) वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय : (1) क, ड (2) अ, ब (3) फक्त ब (4) अ, क, ड
    • (v) स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे : (अ) चहा - कॉफी (ब) मोटार गाडी - पेट्रोल (क) साखर - गूळ (ड) पेन - शाई. पर्याय : (1) अ, ब, क (2) अ, क (3) ब, क (4) अ, ब, क, ड
    Read the model answer

Q. 2 (A) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले.
    Read the model answer
  2. (ii) भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले.
    Read the model answer
  3. (iii) गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला.
    Read the model answer
  4. (iv) वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% ने वाढ झाली.
    Read the model answer
  5. (v) टीनाने ₹ 50,000 ची एकरकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली.
    Read the model answer

Q. 2 (B) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
    Read the model answer
  2. (ii) मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार
    Read the model answer
  3. (iii) सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती
    Read the model answer
  4. (iv) साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक
    Read the model answer
  5. (v) प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर
    Read the model answer

Q. 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) उपयोगितेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही चार स्रोत स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. (iv) विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer
  5. (v) खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा : वस्तू अ, ब, क, ड. 2015 च्या किंमती (₹): 6, 16, 24, 4. 2020 च्या किंमती (₹): 8, 18, 28, 6.
    Read the model answer

Q. 4 खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा होय.
    Read the model answer
  2. (ii) सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो.
    Read the model answer
  3. (iii) राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
    Read the model answer
  4. (iv) सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला जातो.
    Read the model answer
  5. (v) एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत.
    Read the model answer

Q. 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. किंमत (₹); पुरवठा नगसंख्या: 10, 200; 15, …; 20, 300; 25, 350; 30, …; 35, …; 40, …
    • (अ) वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. (2)
    • (ब) वरील पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा. (2)
    Read the model answer
  2. (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. (आकृती 'अ' मध्ये 'य' अक्षास समांतर उभा मागणी वक्र मम; आकृती 'ब' मध्ये आयताकृती अतिपरवलयासारखा मागणी वक्र मम, किंमत क वरून क1 व मागणी म वरून म1.)
    • (1) आकृती 'अ' मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. (2)
    • (2) आकृती 'ब' मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. (2)
    Read the model answer
  3. (iii) खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा "डिजिटल मार्केटिंगला ऑनलाइन मार्केटिंग म्हणतात." येथून "परिणामस्वरूप एक व्यक्ती एक ब्रँड तयार करू शकतो, जो उत्कृष्ट ग्राहक अनुभव देतो." येथपर्यंत आहे.
    • (1) डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? (1)
    • (2) अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाइन असतात ? (1)
    • (3) वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. (2)
    Read the model answer

Q. 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (16 marks)

  1. (i) मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!