munotes®

HSC Chemistry March 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Chemistry-March-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-303 · 8 pages · 1.9 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (18 marks)

  1. Q. 1 खालील प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा:
    • (i) शॉटकीचा दोष (Schottky defect) यात आढळून येत नाही …: (अ) NaCl (ब) KCl (क) AgBr (ड) NiO
    • (ii) 0.1 m युरियाच्या जलीय द्रावणाचा गोठणांक (freezing point) किती आहे, जर पाण्यासाठी Kf ची किंमत 1.86 K kg mol^(−1) असेल: (अ) 1.86 °C (ब) −1.86 °C (क) 0.186 °C (ड) −0.186 °C
    • (iii) ओझोनच्या थरास यामुळे छिद्र (depletion) पडते: (अ) NO (ब) NO2 (क) NO3 (ड) N2O5
    • (iv) जेव्हा जटिल रचनेत (complex) अतिरिक्त AgNO3 मिसळले जाते तेव्हा एक मोल AgCl चा अवक्षेप प्राप्त होतो. त्या जटिल रचनेचे सूत्र (formula) असेल …: (अ) [CoCl2(NH3)4]Cl (ब) [CoCl(NH3)5]Cl2 (क) [CoCl3(NH3)3] (ड) [Co(NH3)6]Cl3
    • (v) 4 मोल्स सल्फर डायऑक्साईडचे सल्फर ट्रायऑक्साईड मध्ये ऑक्सिडीकरणात Δng ची किंमत असते: (अ) −2 (ब) 2 (क) −4 (ड) 4
    • (vi) खालीलपैकी एकमितीय (one dimensional) नॅनोरचना आहे: (अ) नॅनोकण (ब) नॅनोट्यूब (क) नॅनोफिल्म (ड) नॅनोरॉडस्
    • (vii) खालीलपैकी कोणते सूत्र विद्युत अपघटनीचा विचरणाचा अंश (degree of dissociation) आणि संहती यातील संबंध दर्शविते: (अ) c = √(Ka/α) (ब) α = √(Ka/c) (क) c = √(Ka α) (ड) c = √(α/Ka)
    • (viii) खालीलपैकी कोणते संयुग जास्तीत जास्त आम्लधर्मी स्वरूपाचे आहे: (अ) बेन्झीन वलयावर COOH आणि त्याच्या मेटा (3) स्थानी OH (ब) बेन्झीन वलयावर COOH आणि ऑर्थो स्थानी NH2 (क) बेन्झीन वलयावर COOH (बेन्झॉइक आम्ल) (ड) बेन्झीन वलयावर COOH आणि पॅरा स्थानी OCH3
    • (ix) विद्युत अपघटनीची मोलर वाहकता (molar conductivity) मोजण्यासाठी हे सूत्र वापरतात: (अ) Λ = 1000c/k (ब) c = 1000Λ/k (क) Λ = 1000k/c (ड) k = 1000/Λc
    • (x) खालीलपैकी कोणते द्वितीयक अमाईन आहे: (अ) सायक्लोहेक्झीलअमाईन (ब) आयसोप्रोपिल अमाईन (क) डायफेनिलअमाईन (ड) N,N-डायमिथिल ॲनिलिन
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
    • (i) N,N-डायमिथिल इथॅनअमाईनचे रचना सूत्र लिहा.
    • (ii) क्लेमेन्सनच्या क्षपण अभिक्रियेत कार्बोनिल मूलकाचे क्षपण करणारे अभिकारक कोणते ते लिहा.
    • (iii) आयसोप्रीन (isoprene) एककाचे IUPAC नाव लिहा.
    • (iv) A → उत्पादन या अभिक्रियेसाठी दर नियम समीकरण आहे: दर = k[A]^x. 'A' ची संहती वाढविल्यास त्याचा अभिक्रियेच्या वेगावर काय परिणाम होतो जर x < 0 ?
    • (v) एक KBr च्या जलीय द्रावणाचा गोठणांक (freezing point) −3.72°C असल्यास त्याची मोललता (molality) किती असेल? [पाण्यासाठी Kf = 1.86 K kg mol^(−1)]
    • (vi) अतिरिक्त अमोनियाची क्लोरीनवर क्रिया: यासाठी संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
    • (vii) जटिल रचना तयार करताना EDTA मध्ये किती दाता (donor) अणु उपस्थित असतात त्यांची संख्या लिहा.
    • (viii) पितळ (brass) संमिश्रातील धातू मूलद्रव्यांची नावे लिहा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (16 marks)

  1. Q. 3 प्रथम वर्ग अभिक्रियेसाठी अर्ध आयुष्य आणि दर स्थिरांकातील संबंध व्युत्पन्न करा.
    Read the model answer
  2. Q. 4 (अ) हेन्रीचा नियम सांगा. (ब) व्याख्या लिहा: परासरण दाब
    Read the model answer
  3. Q. 5 लॅन्थेनॉईडस् आणि ॲक्टिनॉईडस् मधील फरक लिहा.
    Read the model answer
  4. Q. 6 खालील मुद्द्यांच्या आधारे ऑक्सिजनची असंगत वर्तणूक (anomalous behaviour) लिहा: (i) अण्वीयता (ii) ऑक्सिडीकरण स्थिती (iii) चुंबकीय गुणधर्म (iv) हायड्रॉईडस्चे स्वरूप
    Read the model answer
  5. Q. 7 काय क्रिया होते ते लिहा: (i) ॲसिटीक आम्लातील द्रवरूप ब्रोमिनची ॲनिसोलवर (ii) सोडा-लाईमची सोडियम ॲसिटेटवर
    Read the model answer
  6. Q. 8 एका अभिक्रियेत 43 बार (bar) दाबा विरुद्ध अभिकारकाचे आकारमान 8 dm³ ते 4 dm³ इतके कमी होते. येथे घडणारे कार्य (work) kJ मध्ये काढा. [1 dm³. bar = 100 J]
    Read the model answer
  7. Q. 9 जटिल रचनेतील आयनन समघटक (ionization isomers) योग्य उदाहरणासह स्पष्ट करा.
    Read the model answer
  8. Q. 10 सुक्रोजपासून ग्लुकोज कसे तयार करतात ते लिहा.
    Read the model answer
  9. Q. 11 सोडियम आयनचे क्षपण करून 1 g सोडियम धातू मिळविण्यासाठी किती कुलोम्ब विद्युत प्रवाह लागेल?
    Read the model answer
  10. Q. 12 C4H10O रेणुसूत्र असणाऱ्या व सामान्य स्थितीत ऑक्सिडीकरण न होणाऱ्या अल्कोहोलचे रचनासूत्र (structure) आणि IUPAC नाव लिहा.
    Read the model answer
  11. Q. 13 खालील अभिक्रियेतील 'अ' आणि 'ब' पदार्थ ओळखून संपूर्ण अभिक्रिया परत लिहा: CH3-CH=CH2 → (HBr, पेरॉक्साईड) → अ → (अल्कहोलयुक्त KCN, −KBr) → ब
    Read the model answer
  12. Q. 14 खालील तयार करण्याच्या अभिक्रिया लिहा: (i) रोझेनमुंडच्या अभिक्रियेद्वारे ॲसिटाल्डीहाईड (ii) गॅटरमन-कोच फॉरम्युलेशन वापरून बेन्झाल्डीहाईड
    Read the model answer

Section C: विभाग क: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (24 marks)

  1. Q. 15 3d श्रेणीचे सर्वसामान्य इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. सल्फ्युरिक आम्ल आणि थायोसल्फ्युरिक आम्लाचे रचनासूत्र (structure) काढा.
    Read the model answer
  2. Q. 16 व्याख्या लिहा: संयुक्त आम्ल-अल्कली जोडी. NaOH च्या जलीय द्रावणात हायड्रॉक्सिल आयन्सची संहती 2 × 10^(−4) mol dm^(−3) आहे. त्या द्रावणाच्या pH चे गणन करा.
    Read the model answer
  3. Q. 17 अणु अर्थशास्त्र (atom economy) म्हणजे काय? नॅनोसाहित्याचे (nanomaterial) कोणतेही दोन उपयोग स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. Q. 18 पेप्टाईड बंध म्हणजे काय? तो कसा तयार होतो? अल्किल हलाईडचे नायट्रोअल्केन मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरलेल्या अभिकारकाचे नाव आणि सूत्र लिहा.
    Read the model answer
  5. Q. 19 (अ) खालील अभिकारकांची फेनॉलवर काय क्रिया होते याच्या अभिक्रिया लिहा: (i) नायट्रेटींग मिश्रण (ii) Zn पावडर (ब) फॉस्फरस पेन्टाक्लोराईडची इथिल मिथिल इथर वर काय क्रिया होते?
    Read the model answer
  6. Q. 20 (अ) EAN गणन करणारे सूत्र लिहा. (ब) [CO(NH3)6]^(3+) आयन तयार करणे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा: (i) संकराचा प्रकार (ii) चुंबकीय गुणधर्म
    Read the model answer
  7. Q. 21 (अ) M^(2+) आयन्सच्या आभ्रम चुंबकीय आघूर्णाचे (spin only magnetic moment) गणन करा: [M चा अणुअंक = 26] (ब) गॅडोलिनिअमचे (z = 64) संघनित (condensed) इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
    Read the model answer
  8. Q. 22 (अ) झोत-भट्टीतील क्षपणक पट्ट्यामध्ये Fe2O3 चे Fe मध्ये क्षपण करणारा क्षपणक लिहा. (ब) खालील रासायनिक अभिक्रिया लिहा: (i) इथिल अमाईनसाठी कार्बिल अमाईन अभिक्रिया (ii) ॲसिटामाईडसाठी हॉफमन ब्रोमामाईड डीग्रेडेशन अभिक्रिया
    Read the model answer
  9. Q. 23 (अ) बेन्झाल्डीहाईडच्या मदतीने कॅन्निझारोची (Cannizzaro's) अभिक्रिया स्पष्ट करा. (ब) सायक्लोहेक्झीनचे ॲडीपिक आम्लात कसे रूपांतर कराल याची अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  10. Q. 24 व्याख्या लिहा: शून्य वर्ग (zero order) अभिक्रिया. एक अभिक्रिया दोन पायऱ्यांत घडते: (i) NO(g) + Cl2(g) → NOCl2(g) (ii) NOCl2(g) + NO(g) → 2NOCl(g). एकूण अभिक्रिया लिहा आणि अभिक्रियेतील मध्यस्थ पदार्थ (intermediate) ओळखा.
    Read the model answer
  11. Q. 25 300 K तापमानास इथेन वायू तयार करण्याचा ऊष्मा ΔH हा −84.4 kJ आहे. त्याच अभिक्रियेसाठी ΔU चे गणन करा.
    Read the model answer
  12. Q. 26 आंतररेण्वीय बलाच्या आधारे बहुवारिकांचे प्रकार (type) लिहा. कमी घनता पॉलिइथिलिनचे कोणतेही दोन उपयोग लिहा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा (12 marks)

  1. Q. 27 (अ) 27 g/mol मोलर वस्तुमान असणारे मूलद्रव्य 405 pm कडांची लांबी असलेला एक घनाकृती एकक कोश तयार करतो. स्फटिकाची घनता 2.7 g cm^(−3) असल्यास एकक कोशाचा प्रकार ओळखा. (ब) अबाष्पशील द्राव्य पदार्थ असणाऱ्या द्विअंगी (binary) द्रावणासाठी राओल्टच्या नियमाचे (Raoult's law) समीकरण व्युत्पन्न करा.
    Read the model answer
  2. Q. 28 (अ) खालील उदाहरणात एन्ट्रॉपी (entropy) बदल धन आहे की ऋण ते सांगा: (i) बर्फाचे वितळणे (ii) द्रव पदार्थाचे बाष्पन (vapourization) (ब) समान आयन्सचा परिणाम उदाहरणासह स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. Q. 29 शिशाच्या विद्युत संचायक घटाची सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. घट डिस्चार्जिंग प्रक्रियेत कॅथोड व ॲनोडला घडणाऱ्या एकूण अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  4. Q. 30 (अ) व्याख्या लिहा: एकक कोश (unit cell). F-सेंटर तयार झाल्यामुळे NaCl स्फटिक कोणता रंग दर्शवितो? (ब) 17 व्या गटात (group) फ्ल्युरिन असंगत वर्तणूक का दाखवितो?
    Read the model answer
  5. Q. 31 (अ) SN2 अभियांत्रिकीची वैशिष्ट्ये (salient features) लिहा. (ब) खालील अभिकारकांची ब्रोमोमिथेनवर काय क्रिया होते? (i) ब्रोमोबेन्झीन (ii) मरक्युरस फ्ल्युराईड
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!