munotes®

HSC Book-Keeping and Accountancy March 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Book-Keeping-and-Accountancy-March-2024-Marathi-Medium.pdf
Board paper J-898 · 11 pages · 1.2 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 खालील सर्व उपप्रश्न सोडवा (20 marks)

  1. (A) गटात न बसणारा शब्द ओळखा :
    • (1) विक्री झालेले भांडवल / खपलेले भांडवल, मागणी केलेले भांडवल, वसूल झालेले भांडवल, समभाग
    • (2) इमारत, देय विपत्र, उपस्कर, यंत्र
    • (3) विपत्र स्वतः जवळ ठेवणे, विपत्राची नोंदणी, विपत्र वटविणे, विपत्राचे पृष्ठांकन
    • (4) अंकेक्षण शुल्क, विमा, वैद्यकीय खर्च, किरकोळ प्राप्ती
    • (5) सामान्य निधी, धनको, गुंतवणूक, भांडवल
    Read the model answer
  2. (B) खालील विधानांसाठी आपण सहमत आहात की असहमत आहात ते सांगा :
    • (1) नफा न कमविणाऱ्या संस्था ताळेबंद तयार करीत नाहीत.
    • (2) चालू खाते नेहमी नावे बाकी दर्शविते.
    • (3) विनिमय विपत्र म्हणजे सशर्त आज्ञा होय.
    • (4) निवृत्त भागीदाराला राखीव निधी आणि संचित नफ्यात हिस्सा मिळतो.
    • (5) विसर्जनाच्या वेळी रोख / बँक खाते आपोआप बंद होते.
    Read the model answer
  3. (C) खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड करा आणि विधाने पुन्हा लिहा :
    • (1) संस्था विसर्जनाच्या वेळी संपत्ती आणि देयता … खात्याला स्थानांतरित होतात. (अ) बँक (ब) भागीदारांचे भांडवल (क) रोखीकरण (ड) भागीदारांचे चालू
    • (2) भागीदारी करारात उल्लेख नसेल तर भागीदाराच्या कर्जावर … दराने व्याज देय असेल. (अ) 5% (ब) 6% (क) 10% (ड) 9%
    • (3) जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली असेल तर … खाते नावे होते. (अ) पुनर्मूल्यांकन (ब) भांडवल (क) संपत्ती (ड) ताळेबंद
    • (4) निवृत्त भागीदाराला द्यावयाची राशी रोख दिली नसल्यास भांडवल खात्याची शिल्लक त्याच्या … खात्याला स्थानांतरित करतात. (अ) कर्ज (ब) वैयक्तिक (क) चल (ड) मुलाच्या
    • (5) उत्पन्न खर्च खाते हे … खाते आहे. (अ) भांडवल (ब) वास्तविक (क) वैयक्तिक (ड) नामधारी
    Read the model answer
  4. (D) खालील विधानांसाठी एक शब्द / शब्दसमूह किंवा संज्ञा द्या :
    • (1) टॅली (Tally) ही संगणक प्रणाली (software) या प्रकारात मोडते.
    • (2) भागीदारांमधील लिखित असलेला करार.
    • (3) अशी संपत्ती जिचे सहजपणे रोखीत रूपांतर करता येते.
    • (4) मृत भागीदाराचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती.
    • (5) उत्पन्न-खर्च खात्याची नावे शिल्लक.
    Read the model answer

Q. 2 (10 marks)

  1. सीता आणि गीता या 3 : 2 प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणाऱ्या भागीदार आहेत. 31 मार्च 2020 रोजी त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: भांडवल : सीता ₹ 22,500, गीता ₹ 18,000 (₹ 40,500); धनको ₹ 18,750; देय विपत्र ₹ 15,000; बँक कर्ज ₹ 24,000; सामान्य संचिती / निधी ₹ 3,750; एकूण ₹ 1,02,000. संपत्ती: बँक ₹ 11,250; प्राप्य विपत्र ₹ 5,700; ऋणको ₹ 31,200 − सं. क. नि. ₹ 1,200 (₹ 30,000); स्कंध ₹ 18,000; उपस्कर ₹ 7,050; यंत्रसामग्री ₹ 7,500; इमारत ₹ 22,500; एकूण ₹ 1,02,000. 1 एप्रिल 2020 रोजी त्यांनी रिताला खालील अटीवर भागीदारीत प्रवेश दिला :
    • (1) भागीदारीच्या भविष्यातील नफ्यातील अर्ध्या (1/2) हिस्स्यासाठी रिताने ₹ 15,000 भांडवल आणि ₹ 7,500 ख्याती नगदी आणावी.
    • (2) उपस्कराचे मूल्य ₹ 8,025 पर्यंत वाढविण्यात यावे व इमारतीचे मूल्य 20% वाढवावे.
    • (3) संशयित बुडीत कर्जनिधी ₹ 1,500 पर्यंत ठेवावी.
    • (4) स्कंधाचे 10% आणि यंत्रसामग्रीचे 5% मूल्य कमी करण्यात यावे.
    • (5) जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम उचलली. भागीदारीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी करा.
    Read the model answer
  2. OR शिवशक्ती ट्रेडर्स, मुंबई यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. भागीदार नफा-तोटा 5 : 2 : 3 प्रमाणात विभागतात : ताळेबंद 31 मार्च, 2020 रोजीचा. देयता: धनको ₹ 30,000; देय विपत्र ₹ 1,800; सामान्य निधी ₹ 21,000; भांडवल : राज ₹ 54,000, राहूल ₹ 48,000, नितीन ₹ 26,400; एकूण ₹ 1,81,200. संपत्ती: बँक ₹ 18,600; ऋणको ₹ 25,200 (−) सं.क.नि. ₹ 1,200 (₹ 24,000); स्कंध ₹ 30,600; इमारत ₹ 60,000; यंत्र व संयंत्र ₹ 48,000; एकूण ₹ 1,81,200. 1 एप्रिल, 2020 ला राहुल व्यवसायातून खालील अटीवर निवृत्त झाला :
    • (1) संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे : (अ) यंत्र व संयंत्रावर 10% दराने घसारा आकारा. (ब) ऋणकोवर ₹ 1,500 पर्यंत संशयित बुडीत कर्ज निधीची तरतूद करावी. (क) इमारतीचे मूल्य 10% वाढवावे. (ड) स्कंध ₹ 42,000
    • (2) निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या हिस्स्याच्या ख्यातीचे मूल्य ₹ 12,000 लावावे आणि उरलेल्या भागीदारांनी असे ठरविले की ख्यातीचे अपलेखन त्यांच्या नवीन लाभविभाजनाच्या प्रमाणात करावे. लाभविभाजनाचे नवीन प्रमाण 5 : 3 आहे.
    • (3) राहुल यांना निवृत्तीच्यावेळी द्यावयाची राशी त्याच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करावी. तयार करा : (अ) नफा-तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) संस्थेचा नवीन ताळेबंद
    Read the model answer

Q. 3 (10 marks)

  1. लाल, बाल आणि पाल हे भागीदार असून 2 : 2 : 1 या प्रमाणात नफा-तोटा वाटून घेतात. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2020 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: भांडवल खाती : लाल ₹ 60,000, बाल ₹ 20,000, पाल ₹ 20,000; सामान्य संचिती ₹ 6,000; धनको ₹ 48,000; देय विपत्र ₹ 14,000; एकूण ₹ 1,68,000. संपत्ती: यंत्र ₹ 50,000; गुंतवणूक ₹ 24,000; ऋणको ₹ 55,000 (−) सं.क.नि ₹ 3,000 (₹ 52,000); स्कंध ₹ 20,000; नफा-तोटा खाते ₹ 18,000; बँक ₹ 4,000; एकूण ₹ 1,68,000. वरील तारखेला भागीदारांनी संस्था विसर्जित करण्याचे ठरविले.
    • (1) संपत्तीचे रोखीकरण खालील प्रमाणे : यंत्र ₹ 45,000, स्कंध ₹ 18,000, गुंतवणूक ₹ 21,000, ऋणको ₹ 45,000.
    • (2) विसर्जन खर्च ₹ 3,000
    • (3) संस्थेच्या ख्यातीचे रोखीकरण ₹ 24,000. तयार करा : (अ) रोखीकरण खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) बँक खाते
    Read the model answer
  2. OR श्री अरविंद यांच्या पुस्तकात खालील व्यवहारांच्या रोजकीर्द नोंदी करा :
    • (अ) सॅमने स्वीकारलेल्या व बँकेत राशी संग्रहणासाठी पाठविलेल्या ₹ 30,000 च्या विपत्राचे शोधन झाल्याचे व ₹ 200 बँक खर्च झाल्याची सूचना बँकेकडून मिळाली.
    • (ब) अरुणने अरविंदला कळविले की निनाने स्वीकारलेले व अरुणला पृष्ठांकित केलेले ₹ 25,000 चे विपत्र अनादरीत झाले व अरुणला ₹ 400 नोंदणी खर्च आला.
    • (क) जयने स्वीकारलेले आणि बँकेत वटविलेले ₹ 35,000 चे विपत्र अनादरीत झाल्याचे व नोंदणी खर्च ₹ 500 केल्याची सूचना बँकेकडून प्राप्त झाली.
    • (ड) अरविंदने सागरला ₹ 20,000 चा माल उधारीने विकला आणि त्याच रकमेचे दोन महिने मुदतीचे विपत्र सागर वर काढले.
    • (इ) निताने ₹ 16,500 च्या विपत्राचे अरविंदला ₹ 16,000 रोख देऊन निवर्तन केले.
    Read the model answer

Q. 4 (8 marks)

  1. मोहिनी कंपनी लि. ने प्रत्येकी ₹ 100 चे 25,000 समभाग विक्रीस काढले (निर्गमित केले) त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे : अर्जासोबत ₹ 20; आवंटनावर ₹ 30; प्रथम याचनेवर ₹ 20; द्वितीय आणि अंतिम याचनेवर ₹ 30. 22,000 समभागांकरिता अर्ज आले आणि त्यांना आवंटन / वाटप करण्यात आले. कंपनीला येणे असलेल्या सर्व रकमा मिळाल्या. मोहिनी कंपनी लि. च्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी करा.
    Read the model answer
  2. OR संगणकीय लेखांकन प्रणालीची वैशिष्ट्ये लिहा.
    Read the model answer

Q. 5 (8 marks)

  1. सुरेश, नरेश आणि परेश हे भागीदार समान प्रमाणात नफा-तोटा विभागून घेतात. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च, 2019 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाते : सुरेश ₹ 2,50,000, नरेश ₹ 1,00,000, परेश ₹ 1,00,000; विविध धनको ₹ 1,50,000; एकूण ₹ 6,00,000. संपत्ती: जमीन व इमारत ₹ 2,00,000; फर्निचर ₹ 1,50,000; ऋणको ₹ 1,50,000; रोख ₹ 1,00,000; एकूण ₹ 6,00,000. दिनांक 30 जून, 2019 रोजी सुरेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर करारानुसार खालील समायोजन करण्यात आले.
    • (1) फर्निचरचे समायोजन करून त्याचे विपणीमूल्यानुसार ₹ 1,70,000 लावण्यात आले.
    • (2) जमीन व इमारतीवर 10% दराने घसारा आकारण्यात यावा.
    • (3) ऋणकोवर 5% संशयित व बुडीत कर्ज निधीची तरतूद करावी.
    • (4) सुरेशच्या नफ्यातील हिस्स्याचे आगणन त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत करतांना मागील वर्षाचा सरासरी नफा ₹ 90,000 विचारात घ्यावा. तयार करा : (अ) नफा-तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) उर्वरीत भागीदारांच्या संस्थेचा ताळेबंद
    Read the model answer
  2. OR खाली दिलेल्या व्यापार आणि नफा-तोटा खात्याचे उभे (vertical) उत्पन्न विवरण तयार करा : व्यापार आणि नफा-तोटा खाते (31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता). नावे: प्रारंभण स्कंध ₹ 50,000; खरेदी ₹ 4,50,000; वाहतूक खर्च ₹ 20,000; प्रत्यक्ष खर्च ₹ 30,000; मजुरी ₹ 50,000; ढोबळ नफा (खाली नेला) ₹ 1,50,000; एकूण ₹ 7,50,000. जमा: विक्री ₹ 6,00,000; संवरण स्कंध ₹ 1,50,000; एकूण ₹ 7,50,000. नावे: कार्यालय खर्च ₹ 62,500; वित्तीय खर्च ₹ 15,000; विक्री खर्च ₹ 50,000; शुद्ध नफा (पुढे नेला) ₹ 22,500; एकूण ₹ 1,50,000. जमा: ढोबळ नफा (खाली आणला) ₹ 1,50,000; एकूण ₹ 1,50,000.
    Read the model answer

Q. 6 (12 marks)

  1. 1 एप्रिल, 2019 रोजी डॉ. अनिश कोरगांवकर यांनी वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. त्यांचे 31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे प्राप्ती-शोधन खाते आणि समायोजन खाली दिलेल्या आहेत. त्या आधारे 31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी उत्पन्न-खर्च खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा. डॉ. अनिश कोरगांवकर यांचे प्राप्ती आणि शोधन खाते 31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ती: व्यवसायाचे प्रारंभी रोख आणली ₹ 50,000; तपासणी शुल्क ₹ 20,000; दवाखान्यापासून प्राप्ती ₹ 60,000; विविध प्राप्ती ₹ 10,000; एकूण ₹ 1,40,000. शोधन: उपस्कर ₹ 16,000; उपकरणे ₹ 20,000; औषधे ₹ 14,000; पगार ₹ 24,000; भाडे ₹ 12,000; वाहन खर्च ₹ 8,000; लेखन सामग्री ₹ 1,000; विद्युत शुल्क ₹ 10,000; नियतकालिके ₹ 1,000; उचल ₹ 30,000; शिल्लक (पुढे नेली) ₹ 4,000; एकूण ₹ 1,40,000. अतिरिक्त माहिती :
    • (1) तपासणी शुल्काचे ₹ 4,000 आणि दवाखाना प्राप्तीचे ₹ 1,000 येणे बाकी आहे.
    • (2) अदत्त खर्च - भाडे ₹ 1,000, पगार ₹ 2,000
    • (3) औषधांचा साठा ₹ 2,000
    • (4) उपस्करावर वार्षिक 8% दराने आणि उपकरणावर ₹ 1,000 घसारा आकारण्यात यावा.
    • (5) 40% वाहनखर्च हा घरगुती वापराशी संबंधित आहे.
    Read the model answer

Q. 7 (12 marks)

  1. मामा आणि काका समान प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. खालील परीक्षा सूची आणि समायोजनांच्या आधारे 31 मार्च, 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता नफा-तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा : परीक्षा सूची 31 मार्च, 2019 रोजीची. नावे शिल्लक: विमा ₹ 30,000; जमीन आणि इमारत [1 जूलै, 2018 रोजी ₹ 40,000 ची वाढ] ₹ 1,00,000; वेतन ₹ 10,000; निर्यात कर ₹ 5,000; व्याज ₹ 2,000; उपस्कर ₹ 80,000; ऋणको ₹ 52,000; एकूण ₹ 2,79,000. जमा शिल्लक: भांडवल खाती : मामा ₹ 1,00,000, काका ₹ 1,00,000; 10% दराचे बँक कर्ज [1.10.2018 रोजी घेतले] ₹ 60,000; व्याज ₹ 3,000; देय विपत्र ₹ 16,000; एकूण ₹ 2,79,000. समायोजना :
    • (1) ढोबळ नफा ₹ 69,000.
    • (2) पूर्वदत्त विमा ₹ 7,500 आहे.
    • (3) जमीन आणि इमारतीवर वार्षिक 10% दराने तसेच उपस्करावर वार्षिक 5% दराने घसारा आकारा.
    • (4) बुडीत कर्ज ₹ 2,000 अपलेखित करून शिल्लक ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्जनिधीची तरतूद करा.
    • (5) संवरण स्कंधाचे मूल्य ₹ 69,000.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!