munotes®

HSC Biology June 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Biology-June-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J298 · 7 pages · 1.9 MB

Loading PDF...

Older exam March 2026 (Marathi medium) Board exam · Biology →
Newer exam None yet: this is the latest New papers land after each exam.

Questions asked in this paper

Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (18 marks)

  1. Q. 1 खालीलपैकी बहुपर्यायी प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा:
    • (i) वाइन, व्हिस्कि, इत्यादी मद्यांच्या उत्पादनात वापरले जाणारे सूक्ष्मजीव … (अ) स्ट्रेप्टोमायसिस व्हेनेझुएली (ब) सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी (क) ॲस्परजिलस नायगर (ड) स्ट्रेप्टोमायसेस ग्रिसियस
    • (ii) खालीलपैकी कोणती दिन-उदासि वनस्पती (Day Neutral Plant) नाही? (अ) काकडी (ब) टमाटा (क) कापूस (कपाशी) (ड) तंबाखू
    • (iii) अधोवाही (phloem) कडून अन्न जेव्हा मज्जाक्षेत्राकडे (pith) वाहून नेले जाते, त्यास … वहन असे म्हणतात. (अ) त्रिज्य (radial) (ब) स्पर्शिकीय (tangential) (क) उर्ध्वगामी (ड) अधोगामी
    • (iv) पोषिता माशांचे नामशेष होणे, याची परिणती त्या माशांवरील परजीवांच्या नामशेष होण्यात होते. हे … चे उदाहरण आहे. (अ) अति-शोषण (ब) एलीयन प्रजातीचे आक्रमण (क) सह-नामशेषिकरण (ड) अधिवासाचा ऱ्हास
    • (v) फ्लॅवर सॅवर (Flavr savr) ही टोमॅटोची प्रजाती … सुधारण्यासाठी जनुकीय रित्या रूपांतरित करण्यात आली आहे. (अ) टिकण्याचा कालावधी (ब) रोगास प्रतिबंध (क) लोहाची मात्रा (ड) उत्पादन
    • (vi) पोषकतत्त्वे असलेल्या पेट्रीडिशमध्ये कमी कालावधीमध्ये जीवाणूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते. ही … वाढ आहे. (अ) हळुवार / संथ (ब) घातांकीय (क) लॉजिस्टिक / स्थिर (ड) रेखीय
    • (vii) वजनात घट, वाढलेला चयापचयाचा दर (BMR) आणि बटबटीत डोळे ही … ची लक्षणे आहेत. (अ) क्रेटीनिझम (ब) एक्झोप्थॉल्मिक गॉयटर (क) मिक्झोडीमा (ड) साधा गायटर (गलगंड)
    • (viii) चरस आणि गांजा ही उत्पादीते … पासून मिळविली जातात. (अ) पॅपॅव्हर सेम्निफेरम (ब) एरिथ्रोझायकेम कोका (क) ॲट्रोपा बेलॅडोना (ड) कॅनाबिस सटायव्हा
    • (ix) समधर्मी अवयव (analogous organ) निवडा (अ) सरडा आणि पक्षी यांचे पुढचे पाय (ब) रताळी आणि बटाटा (क) बोगनविलीयाचे काटे आणि काकडीचे प्रतान (tendril) (ड) वर्मीरूपी आंत्रपुच्छ आणि सिकम
    • (x) खालीलपैकी कोणते उदाहरण प्राथमिक क्रमागततेचे आहे? (अ) मोठ्या प्रमाणावर असलेल्या (सोडून दिलेल्या) शेतीक्षेत्रात वाढलेल्या जंगली वनस्पती (ब) वणवा लागलेल्या गवताळ प्रदेशात (savanna) झालेली नवीन गवताची वाढ (क) नव्याने निर्माण झालेले ज्वालामुखीय उपद्वीप लायकेनयुक्त होणे (ड) डोंगरउतारावरील मियावाकी वनस्पती लागवड
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
    • (i) आवृत्तबिजीमध्ये 80 नर युग्मके तयार होण्यासाठी किती अर्धसूत्री विभाजनांची आवश्यकता असते?
    • (ii) rDNA तंत्रज्ञानामधील कोणत्या जैविक साधनास रेण्वीय कात्र्या (molecular scissors) असे देखील संबोधतात?
    • (iii) स्फित पेशीमधील स्फितदाब भित्तीपेशीइतका असल्यास विसरण दाबातील कमतरता किती असेल?
    • (iv) दीर्घदिन वनस्पती (long day plants) म्हणजे काय?
    • (v) मानवी शरीराचा समतोल साधण्यास कारणीभूत असणारा मेंदूचा भाग कोणता?
    • (vi) प्रौढ मानवात एका हृदय चक्रात सामान्यत: किती रक्ताचे पंपिंग केले जाते?
    • (vii) बाळाच्या जन्मानंतर स्तनग्रंथींद्वारे स्रवल्या जाणाऱ्या दुधाचे नाव लिहा.
    • (viii) विषमज्वराच्या (typhoid) कारक घटकाचे नाव लिहा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (16 marks)

  1. Q. 3 पाण्याचे गुणधर्म लिहा.
    Read the model answer
  2. Q. 4 प्लाझ्मिडची अशी गुणवैशिष्ट्ये लिहा ज्यामुळे तो चांगला रोगवाहक (vector) बनतो.
    Read the model answer
  3. Q. 5 प्रतिद्रव्याची (antibody) नामनिर्देशित आकृती काढा.
    Read the model answer
  4. Q. 6 दिलेले पीक आणि त्याचे संकरित वाण यांचा विचार करून जोड्या जुळवा आणि लिहा: स्तंभ I पीक: (i) तांदूळ (ii) मका (iii) ज्वारी (iv) बाजरी; स्तंभ II संकरित वाण: (1) गंगा-3 (2) निफाड (3) रत्ना (4) CO-12
    Read the model answer
  5. Q. 7 दिलेल्या आकृतीमधील A, B, C आणि D ची नावे ओळखून लिहा. (आकृतीत मानवी शुक्रपेशी असून A ते D हे भाग शीर्षाच्या टोकापासून खाली दाखवले आहेत.)
    Read the model answer
  6. Q. 8 ग्रिफीथच्या प्रयोगाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (अ) वापरण्यात येणाऱ्या जीवाणूचे नाव लिहा. (ब) प्रयोगाचा निष्कर्ष
    Read the model answer
  7. Q. 9 'एंजाय (angina) पेक्टोरिस'वर टीप लिहा.
    Read the model answer
  8. Q. 10 'प्लास्टिसिटी' या संज्ञेचे स्पष्टीकरण करा.
    Read the model answer
  9. Q. 11 ग्रॅफीयन फॉलीकलची नामनिर्देशित आकृती काढा. आकृतीत बाह्यावरण, ॲन्ट्रम आणि कोरोना रॅडिएटा दर्शवा.
    Read the model answer
  10. Q. 12 होमो इरेक्टसची कंकालीय वैशिष्ट्ये (skeletal features) लिहा.
    Read the model answer
  11. Q. 13 VI, VII, VIII आणि IX क्रमांकाच्या कर्परा चेतनांची (cranial nerves) नावे लिहा.
    Read the model answer
  12. Q. 14 आलेखीय सादरीकरणासह मधमाशांमधील लिंग निर्धारण (sex-determination) बद्दल लिहा.
    Read the model answer

Section C: विभाग क: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (24 marks)

  1. Q. 15 आर्किओप्टेरिक्समध्ये (Archaeopteryx) आढळणारी सरिसृप वर्गाची आणि पक्षीवर्गाची कोणतीही प्रत्येकी तीन वैशिष्ट्ये लिहा.
    Read the model answer
  2. Q. 16 वर्धी प्रजननातील (vegetative reproduction) घटक म्हणून छेद (cutting) आणि कलम (grafting) यांबद्दल माहिती लिहा.
    Read the model answer
  3. Q. 17 विघटन प्रक्रियेतील निक्षालन (leaching), कृथमुद्रिकरण (humification) आणि खनिजीभवन (mineralization) या पायऱ्या स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. Q. 18 दोन उदाहरणांसह सहभोजिता (commensalism) या संकल्पनेचे वर्णन करा.
    Read the model answer
  5. Q. 19 नामनिर्देशित आकृतीसह मूल रोमाचे (root hair) वर्णन करा.
    Read the model answer
  6. Q. 20 (अ) मानवातील मध्यवर्ती चेतासंस्थेभोवती असणाऱ्या मस्तिष्क-मेरू आवरणांवर (meninges) टीप लिहा. (ब) मस्तिष्क मेरुद्रवाची कार्ये लिहा.
    Read the model answer
  7. Q. 21 (अ) वनस्पतींमध्ये खनिजांच्या कमतरतेमुळे आढळून येणारी कोणतीही चार लक्षणे लिहा. (ब) पोषक खनिज म्हणून मॉलिब्डेनमचे कार्य लिहा.
    Read the model answer
  8. Q. 22 स्तंभ अ आणि स्तंभ ब यांतील योग्य पर्यायांच्या जोड्या जुळवा: स्तंभ अ: (अ) पांडुरोग (ॲनिमिया) (ब) ॲथेरोस्क्लेरॉसिस (क) प्रसूती (पार्टयुरीशन) (ड) रक्तातील गुठळ्या (इ) कर्करोग (फ) मधुमेह; स्तंभ ब: (1) प्लेटलेट्स पोषक वाढीचा घटक (2) रिलॅक्झिन (3) इन्सुलीन (4) एरिथ्रोपोएटीन (5) ऊती प्लाझ्मिनोजेन चेतक (T.P.A.) (6) इंटरफेरॉन्स, अर्बुद ऊतीमारक घटक इंटरल्युकिन्स (tumour necrosis factor interleukins)
    Read the model answer
  9. Q. 23 'जैवविविधतेचे मूलस्थानीय (in situ) संवर्धन', यावर टीप लिहा.
    Read the model answer
  10. Q. 24 मासिक चक्रामध्ये अंडोत्सर्गानंतर येणाऱ्या टप्प्याचे स्पष्टीकरण करा.
    Read the model answer
  11. Q. 25 श्वसनक्रियेमधील आश्वसन आणि उच्छ्वसन यांतील फरकाचे मुद्दे लिहा.
    Read the model answer
  12. Q. 26 (अ) बायोगॅसमधील घटक लिहा. (ब) बायोगॅसचे फायदे लिहा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहा (12 marks)

  1. Q. 27 मानवी हृदयातील कोणत्याही चार झडपांचे स्थान आणि त्यांची कार्ये लिहा.
    Read the model answer
  2. Q. 28 आवृत्तबीजी बीजांडाच्या दिलेल्या आकृतीमधील A, B, C आणि D हे भाग ओळखा. प्रत्येक भागाची फलनानंतरची संभाव्यता (fate) सांगा: (आकृतीत बीजांड असून A ते D हे भाग दाखवले आहेत.)
    Read the model answer
  3. Q. 29 प्रमस्तिष्काच्या (cerebrum) विविध कार्यात्मक भागांची माहिती लिहा.
    Read the model answer
  4. Q. 30 (अ) पुं-जीन्स (holandric genes) वर टीप लिहा. (ब) खालील तक्ता पूर्ण करा: (अ) स्तंभ: (i) मोनोसोमी (ii) … (iii) ट्रायसोमी (iv) …; (ब) स्तंभ: (1) … (2) 2n − 2 (3) … (4) 2n + 2
    Read the model answer
  5. Q. 31 (अ) DNA प्रोफायलिंग म्हणजे काय? (ब) DNA प्रोफायलिंगच्या खाली दिलेल्या पायऱ्या योग्य क्रमाने मांडा: (1) DNA प्रोबची निवड (2) DNA चे विलगीकरण (3) जेल इलेक्ट्रोफोरेसिस (4) संकरण (5) सदर्न ब्लॉटिंग (6) रिस्ट्रिक्शन डायजेशन
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!