munotes®

HSC Chemistry July 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Chemistry-July-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-372 · 8 pages · 1.3 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (18 marks)

  1. Q. 1 खालील प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा:
    • (i) bcc प्रकारच्या स्फटिक जालनात अणूंचा सहबद्धांक (co-ordination number) आहे: (अ) 2 (ब) 4 (क) 6 (ड) 8
    • (ii) हेन्रीच्या नियम स्थिरांकाचे एकक आहे: (अ) mol L^(−1) bar^(−1) (ब) mol^(−1) L bar^(−1) (क) mol L^(−1) bar (ड) mol^(−1) L^(−1) bar^(−1)
    • (iii) मानवी रक्ताचा pH आहे: (अ) 6.9 (ब) 7.0 (क) 7.4 (ड) 8.1
    • (iv) 1.5 bar या स्थिर दाबास आदर्श वायूचे समतापी प्रक्रियेत 20 dm³ ते 25 dm³ इतके प्रसरण होते. या प्रक्रियेतील कार्य dm³bar मध्ये असेल: (अ) −1.5 (ब) −5 (क) −7.0 (ड) −7.5
    • (v) जलीय NaCl च्या विद्युत अपघटनीसाठी बरोबर विधान आहे: (अ) कॅथोडला H2 वायू मुक्त होतो (ब) कॅथोडला Cl2 वायू मुक्त होतो (क) ॲनोडला H2 वायू मुक्त होतो (ड) ॲनोडला O2 वायू मुक्त होतो
    • (vi) जर अभिक्रियेचा दर स्थिरांक mole dm^(−3) sec^(−1) असेल तर त्या अभिक्रियेचा वर्ग (order) असेल: (अ) शून्य (ब) एक (क) 1.5 (ड) 2
    • (vii) आंतर हॅलोजन संयुगांसाठी खालीलपैकी कोणते सर्वसामान्य सूत्र अचूक आहे: (अ) XX'2 (ब) XX'3 (क) XX'4 (ड) XX'6
    • (viii) खालीलपैकी कशात सगळी किरणोत्सारी मूलद्रव्ये उपस्थित आहेत: (अ) 3d श्रेणी (ब) 4d श्रेणी (क) ॲक्टिनॉईड श्रेणी (ड) लॅन्थेनॉईड श्रेणी
    • (ix) ग्रिगनार्डचा अभिकारक तयार करताना हा धातू वापरतात: (अ) Al (ब) Mg (क) Na (ड) Fe
    • (x) खालीलपैकी कोणते डायकार्बोक्झिलीक आम्ल आहे: (अ) ॲसिटीक आम्ल (ब) थॅलिक आम्ल (क) कॅप्रोईक आम्ल (ड) सायट्रिक आम्ल
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
    • (i) एका विशिष्ट अभिक्रियेसाठी अणु अर्थशास्त्राची (atom economy) टक्केवारी (%) गणन करण्याचे सूत्र लिहा.
    • (ii) नायलॉन-6 तयार करण्यास वापरलेल्या एकवारिकाचे (monomer) नाव लिहा.
    • (iii) ग्लुकोजमध्ये उपस्थित असलेल्या एकूण हस्तसम (chiral) अणुंची संख्या लिहा.
    • (iv) खालील अभिक्रिया पूर्ण करा: CH3-C(=O)-NH2 + 4[H] → (Na/C2H5OH किंवा LiAlH4, ether, (H3O)^+) → ? + H2O
    • (v) फेनॉलचे बेन्झीनमध्ये रूपांतर करण्यात वापरलेल्या अभिकारकाचे नाव लिहा.
    • (vi) IUPAC नाव लिहा: बेन्झीन वलयावर -CO-CH3 गट आणि त्याच्या लगतच्या (ऑर्थो) स्थानी Cl असलेले संयुग.
    • (vii) [Fe(CN)6]^(4−) या जटिल रचनेतील 'Fe' ची ऑक्सिडीकरण स्थिती लिहा.
    • (viii) जेव्हा खालीलप्रमाणे 6.0 g O2, ClF बरोबर अभिक्रिया करतो: 2ClF(g) + O2(g) → Cl2O(g) + OF2(g). येथे एन्थॅल्पी बदल 38.55 kJ आहे. यावरून अभिक्रियेच्या प्रमाणित एन्थॅल्पीचे गणन करा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (16 marks)

  1. Q. 3 जेव्हा सोन्याचे स्फटिकीकरण होते तेव्हा ते फेस सेंटर क्युबिक रचना कोश तयार करते. या एकक कोशाच्या कडांची लांबी 4 × 10^(−8) cm आहे. यावरून सोन्याच्या घनतेचे गणन करा. सोन्याचे रेण्वीय वस्तुमान आहे 197 g mol^(−1).
    Read the model answer
  2. Q. 4 व्याख्या लिहा: (अ) समपरासरी द्रावण (ब) कणसंख्यावलंबी गुणधर्म
    Read the model answer
  3. Q. 5 0.01 M हायड्रोजन आयन संहती असणाऱ्या द्रावणाच्या pOH चे गणन करा.
    Read the model answer
  4. Q. 6 वायुस्थिती अभिक्रियेसाठी ΔH आणि ΔU यांतील संबंध व्युत्पन्न करा.
    Read the model answer
  5. Q. 7 सॉल्ट ब्रीज म्हणजे काय? सॉल्ट ब्रीजची कार्ये लिहा.
    Read the model answer
  6. Q. 8 अभिक्रियेचा वर्ग (order) आणि रेण्वीयता (molecularity) यांतील फरक लिहा.
    Read the model answer
  7. Q. 9 खालील मुद्द्यांच्या आधारे फ्ल्यूरीनचे असंगत वर्तन स्पष्ट करा: (i) ऑक्सीआम्ल (ii) हायड्राईडचे स्वरूप (iii) विद्युतऋणीयता (iv) इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी
    Read the model answer
  8. Q. 10 खालील अभिक्रिया संतुलित करा: (i) K2Cr2O7 + KI + H2SO4 → K2SO4 + Cr2(SO4)3 + H2O + I2 (ii) K2Cr2O7 + H2SO4 + H2S → K2SO4 + Cr2(SO4)3 + H2O + 3S
    Read the model answer
  9. Q. 11 खालील सहबद्ध संयुगांची (co-ordination) आणि आयनची IUPAC नावे लिहा: (i) [Cu(NH3)4]^(2+) (ii) Na3[AlF6]
    Read the model answer
  10. Q. 12 खालील अभिक्रिया पूर्ण करा: (i) CH3-CH=CH2 + HBr → ? (ii) C2H5OH + SOCl2 → (Δ) → ?
    Read the model answer
  11. Q. 13 आयसोप्रोपिल बेन्झीनपासून फेनॉल कसा तयार कराल याची रासायनिक अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  12. Q. 14 टीप लिहा: हॅलोफॉर्म अभिक्रिया.
    Read the model answer

Section C: विभाग क: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (24 marks)

  1. Q. 15 बेन्झीन आणि टोल्युन यांच्या मिश्रणात टोल्युनचे वस्तुमान 30% आहे. 30°C तपमानास शुद्ध टोल्युनच्या वाफेचा दाब 36.7 mm Hg आणि शुद्ध बेन्झीनचा 118.2 mm Hg आहे. दोन्ही द्रावण आदर्श द्रावण तयार करतात, असे आपण समजू. 30°C तपमानास द्रावणाच्या प्रत्येक घटकाच्या आंशिक (partial) दाबाचे गणन करा.
    Read the model answer
  2. Q. 16 व्याख्या लिहा: (i) प्रतिरोधक द्रावण (ii) विलयता गुणन फल (iii) समान आयन्सचा परिणाम
    Read the model answer
  3. Q. 17 298 K तपमानास 32 g ऑक्सिजनचे समतापी, व्युत्क्रमी प्रक्रियेत 2 bar ते 1 bar दाबास प्रसरण होते. यावरून महत्तम कार्याचे गणन करा.
    Read the model answer
  4. Q. 18 शून्य वर्ग अभिक्रिया म्हणजे काय? शून्य वर्ग अभिक्रियेसाठी संकलित दर नियमाचे समीकरण व्युत्पन्न करा.
    Read the model answer
  5. Q. 19 (अ) रचनासूत्र लिहा: (i) क्लोरस आम्ल (ii) परक्लोरीक आम्ल (ब) हेलियमचे उपयोग लिहा.
    Read the model answer
  6. Q. 20 (अ) लॅन्थेनॉईडचे आकुंचन म्हणजे काय? (ब) d गट मूलद्रव्यांची संयुगे घन (solid) आणि द्रव (liquid) दोन्ही स्थितीत रंगीत स्वरूपाची असतात. स्पष्ट करा.
    Read the model answer
  7. Q. 21 (अ) सोडियम हेक्झासायनोफेरेट (III) चे निरूपण लिहा. (ब) खालील जटिल रचनेच्या संकराचा प्रकार आणि चुंबकीय गुणधर्माबाबत लिहा: (i) [Co(NH3)6]^(3+) (ii) [NiCl4]^(2−)
    Read the model answer
  8. Q. 22 रूपांतर करा (अभिक्रियेद्वारे दर्शवा): (अ) ॲसिटीक आम्लाचे इथिल ॲसिटेटमध्ये (ब) ॲसिटाअल्डीहाईडचे ॲसिटाअल्डॉक्झाईममध्ये (क) ॲसिटोनचे प्रोपेनमध्ये
    Read the model answer
  9. Q. 23 (अ) खालील अभिकारकांची इथिल अमाईनवर काय क्रिया होते? (i) हिन्सबर्गचा अभिकारक (ii) नायट्रस आम्ल (ब) CH3NH2, (CH3)2NH आणि (CH3)3N यासाठी आम्लारीधर्मीयतेचा चढता क्रम लिहा.
    Read the model answer
  10. Q. 24 (अ) एकशर्करा (monosaccharides) म्हणजे काय? (ब) α अमिनो आम्लाच्या झ्विटर (Zwitter) आयनची रचना काढा. (क) न्युक्लिओटाईड एकवारिकात वापरलेल्या घटकांची (components) नावे लिहा.
    Read the model answer
  11. Q. 25 (अ) टेफ्लॉन (teflon) तयार करण्यासाठी वापरलेली रासायनिक अभिक्रिया लिहा. (ब) नैसर्गिक रबराच्या एकवारिकाचे रचनासूत्र लिहा. (क) जास्त घनता पॉलिथिन (HDP) चे दोन उपयोग लिहा.
    Read the model answer
  12. Q. 26 खालील संज्ञा स्पष्ट करा: (अ) आधारभूत (sustainable) विकास (ब) नॅनोसाहित्य (क) BHC च्या गॅमा समघटकाचे नाव लिहा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा (12 marks)

  1. Q. 27 (अ) स्फटिकी आणि अस्फटिकी घन पदार्थांतील फरक लिहा. (ब) आर्द्रतेच्या उपस्थितीत क्लोरीनची विरंजन क्रिया स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. Q. 28 (अ) प्रमाणित हायड्रोजन इलेक्ट्रोडची सुबक आणि नामनिर्देशित आकृती काढा. (ब) खालील घटाच्या emf चे गणन करा: Mg | Mg^(++)(aq) || Ag^(+)(aq) | Ag, जर E°Mg = −2.37 Volt आणि E°Ag = 0.8 Volt.
    Read the model answer
  3. Q. 29 (अ) 250 K तपमानास ΔH = 50 kJ आणि ΔS = −130 JK^(−1) असेल तर वरील अभिक्रिया उत्स्फूर्त की अउत्स्फूर्त ते सांगा. (ब) 2-क्लोरोब्युटेनची प्रकाशीय क्रियाशीलता स्पष्ट करा. (क) DDT चे दीर्घरूप (long form) लिहा.
    Read the model answer
  4. Q. 30 (अ) व्याख्या लिहा: सहबद्धता (co-ordination) क्रमांक. (ब) रिमर-टिमन (Reimer-Tieman) अभिक्रियेवर टीप लिहा. (क) मिथिल व्हिनील इथरचे रचनासूत्र (structure) लिहा.
    Read the model answer
  5. Q. 31 (अ) इथेनल (ethanal) ची अल्डॉल संघनन अभिक्रिया स्पष्ट करा. (ब) संक्रामक मूलद्रव्यांच्या आंतरछिद्री संयुगांचे चार गुणधर्म लिहा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!