munotes®

HSC Biology July 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Biology-July-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-411 · 8 pages · 3.6 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (18 marks)

  1. Q. 1 अचूक पर्याय निवडा आणि उत्तर लिहा:
    • (i) न्यूक्लिओसोमच्या हिस्टोन अष्टकाभोवती (octamer) आम्लारी युग्मांच्या (base pairs) … जोड्या असतात. (अ) 200 (ब) 146 (क) 54 (ड) 20
    • (ii) खालीलपैकी कोणती संवेदी चेतनी नाही? (अ) I (ब) II (क) III (ड) VIII
    • (iii) भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी पुढीलपैकी कोणते जैवखत (biofertilizer) वापरतात? (अ) अझोटोबॅक्टर (ब) ॲझोस्पायरीलम (क) बॅसिलस (ड) अझोला
    • (iv) उभयचर आणि सरिसृप यांतील जोडणारा दुवा … हा आहे. (अ) आर्किओप्टेरिक्स (ब) ऑस्ट्रॅलोपिथेकस (क) सेमोरिया (ड) इचथिओसोरस
    • (v) मेंडेलच्या 3 : 1 ते 1 : 2 निष्कर्षांमधील जनुक आंतरक्रिया विचलन … हे आहे. (अ) अपूर्ण प्रभाव (incomplete dominance) (ब) सह-प्रभाव (codominance) (क) बहु-युग्मविकल्प (multiple alleles) (ड) बहुप्रभाव (pleiotropy)
    • (vi) mRNA चा आरंभ कोडॉन (initiation codon) ओळखा. (अ) UAA (ब) AUG (क) UAG (ड) UGA
    • (vii) आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बांडगुळ म्हणून वाढणारी ऑर्किड वनस्पती, हा पारिस्थितीक सहसंबंध ओळखा. (अ) परजीविता (parasitism) (ब) असहभोजिता (amensalism) (क) सहभोजिता (commensalism) (ड) सहजीविता (mutualism)
    • (viii) खालीलपैकी कोणत्या घटकामुळे परागकणांचे रसायनांपासून संरक्षण होते? (अ) पेक्टीन (ब) हेमीसेल्यूलोज (क) सेल्यूलोज (ड) स्पोरोपोलेनीन
    • (ix) विशिष्ट प्रतिजनाला जोडला जाऊन प्रतिजन प्रतिद्रव्य संयुक्त जोड तयार करणारा प्रतिद्रव्याचा भाग … हा होय. (अ) पॅराटोप्स (ब) आयसोटोप्स (क) एपिटोप्स (ड) ऑक्टॉमर
    • (x) वनस्पतींमध्ये मेदाचे प्रमाण आणि मेदाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणती जनुके वापरतात? (अ) फायटेज जनुके (ब) ॲराबिडोप्सिस जनुके (क) पुं-गुणसूत्री (holandric) जनुके (ड) कर्करोगजन्य जनुके
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
    • (i) "मेंडेलियन जीवसमूहाच्या सगळ्या जनुकांमध्ये संपूर्ण जनुकीय माहिती संकेतबद्ध स्वरूपात सामावलेली असते." या विधानासाठी वापरली जाणारी संज्ञा लिहा.
    • (ii) पाण्याच्या अधिशोषणामुळे (adsorption) जलस्नेही (hydrophilic) पदार्थ फुगण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?
    • (iii) रक्तातील श्वेतपेशींची संख्या सामान्य संख्येपेक्षा कमी होण्याच्या स्थितीस वापरली जाणारी संज्ञा लिहा.
    • (iv) DNA पट्ट्यावरील न्युक्लिओटाइडच्या आम्लारी बंधांची (base pairs) शृंखला खालीलप्रमाणे असल्यास त्यास कोणती संज्ञा वापरतात? 3′ … CTT AAG … 5′ आणि 5′ … GAA TTC … 3′
    • (v) प्रजाती-क्षेत्रफळाचा संबंध (species area relationship) दर्शविणाऱ्या पुढील आलेखाकृतीमधील 'A' ओळखा: (आलेखात क्षेत्रफळाविरुद्ध प्रजाती समृद्धी दाखवली आहे: वर जाऊन सपाट होणारा A चिन्हांकित वक्र, आणि "log-log scale" चिन्हांकित log S = log C + Z log A ही सरळ रेषा.)
    • (vi) ADH संप्रेरकाच्या न्यूनतेमुळे पाण्याचे पुनर्शोषण कमी होते आणि मूत्रविसर्गाचे प्रमाण वाढते. या स्थितीस काय म्हणतात?
    • (vii) कुटुंबनियोजनाच्या ज्या कायमस्वरूपी पद्धतीमध्ये बीजवाहक नलिका बांधून नंतर कापली जाते; त्या क्रियेस काय म्हणतात?
    • (viii) कार्बन चक्रापासून दूर असणाऱ्या खडक आणि जीवाश्म इंधनामध्ये दीर्घ काळ असणाऱ्या कार्बनी स्थानाचे नाव लिहा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (16 marks)

  1. Q. 3 मुखावाटे श्वसन करण्यापेक्षा नाकावाटे श्वसन करणे अधिक उपयुक्त का ठरते, यांची कोणतीही दोन कारणे लिहा.
    Read the model answer
  2. Q. 4 उत्क्रांतीचे कोणतेही दोन रेण्वीय पुरावे लिहा.
    Read the model answer
  3. Q. 5 जनुक उपचारपद्धतीचे कोणतेही चार उपयोग लिहा.
    Read the model answer
  4. Q. 6 पुढील संज्ञांच्या व्याख्या लिहा: (अ) एक्स्प्लान्ट (explant) (ब) पेशीपुंज (callus)
    Read the model answer
  5. Q. 7 दिलेल्या लक्षणांवरून आजार ओळखा: (अ) श्वसनिकांचे आकुंचन, श्वसनिकांमध्ये श्लेष्म जमा होणे, आवर्ती शिंका येणे (wheezing) श्वास घेण्यास त्रास होणे. (ब) सायनसला सूज येणे आणि श्लेष्म निर्माण होणे.
    Read the model answer
  6. Q. 8 AGR आणि RGR या वनस्पती वाढीसंबंधी असणाऱ्या व्याख्या लिहा.
    Read the model answer
  7. Q. 9 मूलकेशाची (root hair) नामनिर्देशित आकृती काढून त्यात रिक्तिका, तंतुकणिका आणि केंद्रक दर्शवा.
    Read the model answer
  8. Q. 10 गुणसूत्रबिंदूच्या स्थानानुसार गुणसूत्रांचे प्रकार लिहा.
    Read the model answer
  9. Q. 11 डार्विनच्या सिद्धांतामधील कोणत्याही चार त्रुटी लिहा.
    Read the model answer
  10. Q. 12 अमोनीकरण दर्शविणाऱ्या अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  11. Q. 13 पश्चमस्तिष्कपुच्छाची (medulla oblongata) कोणतीही दोन कार्ये लिहा.
    Read the model answer
  12. Q. 14 उदरपटलाची (diaphragm) स्थिती आणि आंतरकंकालीय स्नायूंचे कार्य या मुद्द्यांच्या आधारे आश्वसन आणि उच्छ्वसन यांतील फरकाचे मुद्दे लिहा.
    Read the model answer

Section C: विभाग क: खालील पैकी कोणत्याही आठ प्रश्नांची उत्तरे लिहा (24 marks)

  1. Q. 15 पौगंडावस्था म्हणजे काय? 15 ते 17 वर्षे या वयोगटाची कोणतीही चार वैशिष्ट्ये लिहा.
    Read the model answer
  2. Q. 16 दिलेल्या ग्राफिन फॉलीकलच्या (Graafin follicle) आकृतीमधील A, B आणि C ओळखा, आणि त्यांचे महत्त्व नमूद करा. (आकृतीत ग्राफियन पुटकाचे A, B आणि C असे तीन भाग दाखवले आहेत.)
    Read the model answer
  3. Q. 17 (अ) मध्यवर्ती चेतासंस्थेतील कोणता भाग मस्तिष्कमेरुद्रव (CSF) स्रवतो? (ब) मस्तिष्कमेरुद्रवाची कोणतीही चार कार्ये लिहा.
    Read the model answer
  4. Q. 18 मानवी हृदयातील कोणत्याही तीन झडपांची नावे आणि त्यांचे स्थान लिहा.
    Read the model answer
  5. Q. 19 तृणभक्षकांशी असणाऱ्या आंतरक्रियेदरम्यान वनस्पतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही तीन रासायनिक संरक्षण यंत्रणा स्पष्ट करा.
    Read the model answer
  6. Q. 20 गुणसूत्र क्रमांक 21 च्या एकाधिक द्विगुणितेमुळे (21st trisomy) निर्माण होणाऱ्या विकृतीची कोणतीही सहा लक्षणे लिहा.
    Read the model answer
  7. Q. 21 सूक्ष्मबीजापासून (micropore) पुंयुग्मकोद्भिदाचा (male gametophyte) विकास होणाऱ्या प्रक्रियेचे वर्णन करा. पुंयुग्मकोद्भिदाची सुबक नामनिर्देशित आकृती काढा.
    Read the model answer
  8. Q. 22 विघटनाची व्याख्या लिहा. योग्य क्रमासह विघटनाच्या कोणत्याही चार पायऱ्यांचे स्पष्टीकरण करा.
    Read the model answer
  9. Q. 23 पुढील घटकांच्या कमतरतेमुळे वनस्पतींमध्ये कोणती लक्षणे दिसतात ते लिहा. (अ) पोटॅशिअम (K⁺) (ब) मॅग्नीशिअम (Mg⁺⁺) (क) बोरॉन (BO⁻³)
    Read the model answer
  10. Q. 24 उत्तर आणि दक्षिण भारतातील ऊसाच्या स्थानिक वाणांची शास्त्रीय नावे लिहा. शर्करेचे उच्च प्रमाण असलेल्या ऊसाची वाणे विकसित करणाऱ्या भारतातील केंद्राचे नाव लिहा.
    Read the model answer
  11. Q. 25 योग्य संज्ञा वापरून पुढील तक्ता पूर्ण करा आणि पुन्हा लिहा: अ.क्र., विकृती / रोग / आरोग्यस्थिती, पुनःसंयोजी प्रथिन / प्रथिने: (i) प्रसूती, …; (ii) एम्फिसिमा, …; (iii) …, हिपॅटाइटिस B लस
    Read the model answer
  12. Q. 26 कोणत्याही दोन प्रमुख वायूप्रदूषकांची उदाहरणे द्या. मानवी आरोग्यावर त्यांचा काय दुष्परिणाम होतो, यावर टीप लिहा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालील पैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहा (12 marks)

  1. Q. 27 भ्रूणपोषाची (endosperm) व्याख्या लिहा. भ्रूणपोषाच्या प्रकारांचे वर्णन करा.
    Read the model answer
  2. Q. 28 सुबक नामनिर्देशित आकृतीसह मानवी शुक्रपेशीचे (sperm) वर्णन करा.
    Read the model answer
  3. Q. 29 दृश्यकेंद्रकी राजीवातील hnRNA चे mRNA मध्ये होणारे प्रक्रियाकरण आणि रूपांतरण (transcription) यांचे वर्णन करा.
    Read the model answer
  4. Q. 30 बाष्पोत्सर्जन म्हणजे काय? द्विदल वनस्पतींमधील पर्णरंध्र साधनाची (stomatal apparatus) नामनिर्देशित आकृती काढा. बाष्पोत्सर्जनाचे कोणतेही तीन फायदे लिहा.
    Read the model answer
  5. Q. 31 पियुषिका ग्रंथीच्या अग्रखंडाद्वारे (adenohypophysis) स्रवल्या जाणाऱ्या कोणत्याही चार संप्रेरकांची नावे लिहा आणि त्यांचे महत्त्व सांगा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!