munotes®

HSC Economics March 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Economics-March-2024-Marathi-Medium.pdf
Board paper J-905 · 7 pages · 249 KB

Loading PDF...

Older exam None: this is the earliest we hold
Newer exam July 2024 (Marathi medium) Board exam · Economics →

Questions asked in this paper

Solved paper All 30 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) योग्य पर्याय निवडा :
    • (i) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. (अ) राशी पद्धत (ब) समग्र पद्धत (क) विभाजन पद्धत (ड) सर्वसमावेशक पद्धत. पर्याय : (1) अ, क, ड (2) ब, क, ड (3) फक्त क (4) फक्त अ
    • (ii) असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात. (अ) सावकार (ब) व्यापारी बँका (क) हुंडी (ड) चिटफंड. पर्याय : (1) अ, ब, क (2) ब, क (3) ब, ड (4) अ, क, ड
    • (iii) सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात. (अ) परकीय आक्रमणापासून संरक्षण (ब) शिक्षण व आरोग्य सेवा (क) सामाजिक सुरक्षा उपाययोजना (ड) कर संकलन. पर्याय : (1) ब, क (2) अ, ब, क (3) ब, क, ड (4) वरील सर्व
    • (iv) निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. (अ) भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त (ब) भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त (क) योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त (ड) निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. पर्याय : (1) ब, क, ड (2) अ, ब, क (3) अ, ब, ड (4) अ, क, ड
    • (v) रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे. (अ) स्थल उपयोगिता (ब) ज्ञान उपयोगिता (क) सेवा उपयोगिता (ड) काळ उपयोगिता. पर्याय : (1) अ, ब, क (2) ब, क, ड (3) अ, ब, ड (4) फक्त ड
    Read the model answer
  2. (B) विसंगत शब्द ओळखा :
    • (i) मागणीचे प्रकार : प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी, बाजार मागणी
    • (ii) राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये : आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना, प्रवाही संकल्पना
    • (iii) अंदाजपत्रकाचे प्रकार : तुटीचे अंदाजपत्रक, शून्याधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिलकीचे अंदाजपत्रक
    • (iv) कायदेशीर मक्तेदारी : पेटंट, ओपेक (OPEC), स्वामित्व, बोधचिन्ह
    • (v) वित्तीय मालमत्ता : रोखे, भूमी, सरकारी रोखे, व्युत्पन्न रोखे
    Read the model answer
  3. (C) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा :
    • (i) किंमत स्थिर असतांना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते.
    • (ii) मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.
    • (iii) एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
    • (iv) एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ.
    • (v) फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
    Read the model answer
  4. (D) सहसंबंध पूर्ण करा :
    • (i) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र : : … : सूक्ष्म अर्थशास्त्र
    • (ii) उत्पादन पद्धत : … : : उत्पन्न पद्धत : घटक पद्धती
    • (iii) रूप उपयोगिता : फर्निचर : : … : डॉक्टर
    • (iv) संपूर्ण लवचीक मागणी : Ed = ∞ : : … : Ed = 0
    • (v) … : पुरवठ्यातील बदल : : इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन.
    Read the model answer

Q. 2 (A) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
    Read the model answer
  2. (ii) रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.
    Read the model answer
  3. (iii) कोविड महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.
    Read the model answer
  4. (iv) महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला.
    Read the model answer
  5. (v) जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ 5000/- निवृत्तीवेतन मिळते.
    Read the model answer

Q. 2 (B) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी
    Read the model answer
  2. (ii) एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता
    Read the model answer
  3. (iii) संपूर्ण लवचीक मागणी आणि संपूर्ण अलवचीक मागणी
    Read the model answer
  4. (iv) किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक
    Read the model answer
  5. (v) अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज
    Read the model answer

Q. 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. (iv) सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतेही चार कारणे स्पष्ट करा.
    Read the model answer
  5. (v) स्थूल अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्ये लिहा.
    Read the model answer

Q. 4 खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले.
    Read the model answer
  2. (ii) स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
    Read the model answer
  3. (iii) किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
    Read the model answer
  4. (iv) करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
    Read the model answer
  5. (v) निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.
    Read the model answer

Q. 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. वस्तू; 2006 च्या किमती (₹) (P0) (मूळ वर्ष); 2019 च्या किमती (₹) चालू वर्ष (P1): अ, 20, 30; ब, 30, 45; क, 40, 60; ड, 50, 75; इ, 60, 90.
    • (1) किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा. (1)
    • (2) ΣP0 व ΣP1 च्या किमती काढा. (1)
    • (3) किंमत निर्देशांक (P01) काढा. (2)
    Read the model answer
  2. (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (आकृती: 'य' अक्षावर किंमत ₹ मध्ये, 'क्ष' अक्षावर मागणी कि.ग्रा. मध्ये; मूळ मागणी वक्र मम, उजवीकडील वक्र म1म1 व डावीकडील वक्र म2म2; किंमत क वर स्थिर, मागणी ब वरून ब1 व ब2.)
    • (1) उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र … (1)
    • (2) डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र … (1)
    • (3) वस्तूची किंमत … (1)
    • (4) मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना … या संकल्पने अंतर्गत येतात. (1)
    Read the model answer
  3. (iii) खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा "सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात." पासून "… यामध्ये जाहिरात, फलक, खिडकी प्रदर्शन इत्यादी चा समावेश विक्री खर्चात येतो." पर्यंत आहे.
    • (1) अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. (1)
    • (2) बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा. (1)
    • (3) विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा. (2)
    Read the model answer

Q. 6 सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (16 marks)

  1. (i) मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) पुरवठ्याचा नियम गृहीतकासहित सविस्तर स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!