munotes®

HSC Economics March 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Economics-March-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-355 · 7 pages · 1.7 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 30 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (20 marks)

  1. (A) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा :
    • (i) आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा.
    • (ii) मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.
    • (iii) उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज.
    • (iv) किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता.
    • (v) विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक.
    Read the model answer
  2. (B) सहसंबंध पूर्ण करा :
    • (i) अंतर्गत व्यापार : गृह व्यापार : : आंतरराष्ट्रीय व्यापार : …
    • (ii) भिन्न किंमत : … : : एकच किंमत : पूर्ण स्पर्धा
    • (iii) … : मध्यवर्ती बँक : : SBI : व्यापारी बँक
    • (iv) उत्पादन पद्धत : … : : उत्पन्न पद्धत : घटक पद्धती
    • (v) आर्थिक तेजीचा कालखंड : शिलकीचे अंदाजपत्रक : : आर्थिक मंदीचा कालखंड : …
    Read the model answer
  3. (C) विसंगत शब्द ओळखा :
    • (i) टिकाऊ वस्तू : फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र, मासे
    • (ii) खर्च संकल्पना : एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, विक्री खर्च
    • (iii) कायदेशीर मक्तेदारी : पेटंट, ओपेक, स्वामित्व अधिकार, बोधचिन्ह
    • (iv) आर्थिक कल्याणाचे सिद्धांत : उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता
    • (v) मागणी नियमाचे अपवाद : गिफेनचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, किंमतीचा आभास, श्रमाचा पुरवठा
    Read the model answer
  4. (D) खालील विधाने पूर्ण करा :
    • (i) सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ … (अ) अॅडम स्मिथ (ब) जे.एम. केन्स (क) जे.बी.से. (ड) रॅग्नर फ्रिश
    • (ii) जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार … असतो. (अ) धनात्मक (ब) ऋणात्मक (क) प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक (ड) शून्य
    • (iii) किंमत निर्देशांकाचा उपयोग … (अ) वस्तूंच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी (ब) भौगोलिक साधन म्हणून (क) हवेच्या दाबाचे मोजमाप करण्यासाठी (ड) वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी
    • (iv) विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या … (अ) अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात (ब) उद्योग, कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात (क) नाणे बाजाराचे नियमन करतात (ड) भांडवल बाजाराचे नियमन करतात
    • (v) सरकारचे अनिवार्य (सक्तीचे) कार्य … (अ) शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद (ब) निवृत्ती वेतनाची तरतूद (क) अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे (ड) कल्याणकारी योजनांची तरतूद
    Read the model answer

Q. 2 (A) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) अभिजीतला 15 खुर्च्या विकल्यानंतर ₹ 3000 मिळतात. प्रति खुर्ची त्याला ₹ 200 ची प्राप्ती होते.
    Read the model answer
  2. (ii) राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले, त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला.
    Read the model answer
  3. (iii) राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली.
    Read the model answer
  4. (iv) अमरने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली.
    Read the model answer
  5. (v) सुनिता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली.
    Read the model answer

Q. 2 (B) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) (6 marks)

  1. (i) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
    Read the model answer
  2. (ii) संपूर्ण लवचीक मागणी आणि संपूर्ण अलवचीक मागणी
    Read the model answer
  3. (iii) संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक
    Read the model answer
  4. (iv) अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज
    Read the model answer
  5. (v) पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ
    Read the model answer

Q. 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. (iv) खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू: अ, ब, क, ड. 2005 च्या किंमती (₹): 6, 16, 24, 4. 2010 च्या किंमती (₹): 8, 18, 28, 6.
    Read the model answer
  5. (v) भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
    Read the model answer

Q. 4 खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन) (12 marks)

  1. (i) मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो.
    Read the model answer
  2. (ii) निर्देशांकांना कोणत्याही मर्यादा नाहीत.
    Read the model answer
  3. (iii) मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते.
    Read the model answer
  4. (iv) पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत.
    Read the model answer
  5. (v) भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
    Read the model answer

Q. 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (8 marks)

  1. (i) तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. किंमत (₹); मागणी (किलो) उपभोक्ता 'अ', 'ब', 'क'; बाजार मागणी (किलो) अ + ब + क: 35, 5, 10, 15, …; 30, 10, 15, 20, …; 25, 15, 20, 25, …; 20, 20, 25, 30, …
    • (अ) वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. (2)
    • (ब) वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. (2)
    Read the model answer
  2. (ii) खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आकृती: 'य' अक्षावर वस्तूची किंमत, 'क्ष' अक्षावर वस्तूची मागणी; अरेखीय मागणी वक्र मम1; त्याच्या स बिंदूवर स्पर्शरेषा 'य' अक्षावरील क पासून 'क्ष' अक्षावरील ब पर्यंत; स बिंदूची किंमत प व मागणी म.)
    • (1) जर सब = सक (Ed = 1) = … (1)
    • (2) जर सब > सक (Ed > 1) = … (1)
    • (3) जर सब < सक (Ed < 1) = … (1)
    • (4) 'क्ष' अक्षावर वस्तूची … दर्शविली आहे आणि 'य' अक्षावर वस्तूची … दर्शविली आहे. (1)
    Read the model answer
  3. (iii) नियंत्रित बाजार. उतारा "नियंत्रित बाजार हा असा घाऊक बाजार असतो की, जेथील खरेदी-विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समिती मार्फत नियंत्रित करते." पासून "… बटाटे आणि हळद यांचा व्यापार नियंत्रित केला जातो." पर्यंत आहे.
    • (1) कोणत्या अॅक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात? (1)
    • (2) प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती? (1)
    • (3) वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. (2)
    Read the model answer

Q. 6 सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (16 marks)

  1. (i) घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (ii) राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. (iii) शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!