munotes®

HSC Chemistry March 2026 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Chemistry-March-2026-Marathi-Medium.pdf
Board paper J-156 · 8 pages · 3.2 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 31 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Section A: विभाग अ (18 marks)

  1. Q. 1 खाली दिलेल्या बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडून लिहा:
    • (i) H2-O2 इंधन घटात वापरलेले विद्युत विच्छेद्य (electrolyte) आहे: (अ) जलीय KCl (ब) जलीय KOH (क) जलीय HCl (ड) जलीय KNO3
    • (ii) HOBrO2 या ऑक्सोआम्लात ब्रोमिनची ऑक्सिडीकरण स्थिती आहे: (अ) +7 (ब) +5 (क) +3 (ड) +1
    • (iii) खालीलपैकी हे अभिकारक तापवून ॲसिटोनायट्राईल तयार करता येते: (अ) इथिल क्लोराईडला अल्कहोलयुक्त KCN बरोबर (ब) इथिल क्लोराईडला अल्कहोलयुक्त AgCN बरोबर (क) मिथिल क्लोराईडला अल्कहोलयुक्त KCN बरोबर (ड) मिथिल क्लोराईडला अल्कहोलयुक्त AgCN बरोबर
    • (iv) कार्बोनेटेड पाणी … याचे उदाहरण आहे. (अ) द्रवात घनाचे द्रावण (ब) द्रवात द्रवाचे द्रावण (क) द्रवात वायूचे द्रावण (ड) वायूत द्रवाचे द्रावण
    • (v) जर अभिक्रियेच्या दर स्थिरांकाचे एकक प्रती सेकंद असेल तर त्या अभिक्रियेचा वर्ग (order) … असेल. (अ) शून्य (zero) (ब) प्रथम (क) द्वितीय (ड) तृतीय
    • (vi) एक प्रणाली (system) 10 kJ इतका ऊष्मा बाहेर टाकते आणि 15 kJ एवढे कार्य परिसरावर करते यावरून आंतरिक ऊर्जेतील बदल … असेल. (अ) +5 kJ (ब) −5 kJ (क) +25 kJ (ड) −25 kJ
    • (vii) [Co(NH3)5(NO2)]^(2+) आणि [Co(NH3)5(ONO)]^(2+) ही सहबद्धता आयन्स एकमेकांचे … आहेत. (अ) आयनन (ionization) समघटक (ब) विद्रावक (solvate) समघटक (क) जुळणी (linkage) समघटक (ड) सहबद्ध समघटक
    • (viii) अमाईन्स आणि अमोनिया यांची बेसिक सामर्थ्याची अचूक श्रेणी … आहे. (अ) NH3 > R-NH2 > R2NH > R3N (ब) NH3 > R3N > R2NH > R-NH2 (क) NH3 < R-NH2 > R3N > R2NH (ड) NH3 < R-NH2 < R2NH > R3N
    • (ix) खालीलपैकी 3d श्रेणीतील सगळ्यात जास्त प्रथम आयनिक उष्णताभरणांची (enthalpy) किंमत असणारे मूलद्रव्य आहे: (अ) Zn (ब) Cu (क) Co (ड) Sc
    • (x) 0.01 M HCl च्या द्रावणाचा pOH असेल: (अ) 1 (ब) 2 (क) 11 (ड) 12
    Read the model answer
  2. Q. 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
    • (i) मॅग्नेशियम धातूची सेलेनियमवर अभिक्रिया करून मिळालेल्या उत्पादिताचे नाव लिहा.
    • (ii) घट स्थिरांकाचे SI एकक लिहा.
    • (iii) लॅन्थेनाईड श्रेणीतील किरणोत्सारी मूलद्रव्यांचे नाव लिहा.
    • (iv) खालील अभिक्रिया पूर्ण करा: फिनॉल (बेन्झीन वलयावर OH) + 3 H2 → (निकेल, 433 K) → ?
    • (v) IUPAC नाव लिहा: बेन्झीन वलयावर CHO आणि त्याच्या लगतच्या (ऑर्थो) स्थानी OH असलेले संयुग.
    • (vi) तांब्याची (copper) fcc प्रकारची रचना आहे ज्यामध्ये 495 pm अशी कडांची लांबी आहे. तांब्याच्या अणुची त्रिज्या pm मध्ये किती असेल?
    • (vii) टेफ्लॉनचे (teflon) रासायनिक नाव लिहा.
    • (viii) प्रभावी जिवाणू जंतुनाशक (bacterial disinfectant) म्हणून काम करणाऱ्या नॅनोकणाचे नाव लिहा.
    Read the model answer

Section B: विभाग ब: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (16 marks)

  1. Q. 3 व्याख्या लिहा: (अ) समरूपता (isomorphism) (ब) एकक कोश (unit cell)
    Read the model answer
  2. Q. 4 खालील गुणधर्मातील आवर्तनीयता गण 17 (group 17) मधील मूलद्रव्यांसाठी स्पष्ट करा: (i) अण्वीय त्रिज्या (ii) विद्युतऋणीयता
    Read the model answer
  3. Q. 5 होमोलेप्टीक् आणि हिटरोलेप्टीक् जटिल संयुगे उदाहरणासह स्पष्ट करा.
    Read the model answer
  4. Q. 6 (अ) ब्रोमिन जलाची ग्लुकोजवर होणारी अभिक्रिया लिहा. (ब) व्याख्या लिहा: प्रतिबिंबरूपीते (enantiomers)
    Read the model answer
  5. Q. 7 (i) 100 nm पेक्षा कमी आकार असलेल्या एक परिमाण (dimensional) नॅनो रचनेचे उदाहरण लिहा. (ii) इथिल मिथिल इथरची जलविच्छेदन अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  6. Q. 8 298 K तापमानास 0.822 gm सुक्रोज 300 ml पाण्यात विद्राव्य करून मिळालेल्या द्रावणाच्या परासरण दाबाचे गणन करा. [दिलेल्या गोष्टी: सुक्रोजचे रेण्वीय वस्तुमान 342 g/mol, R = 0.08205 dm³.atm. K^(−1)mol^(−1)]
    Read the model answer
  7. Q. 9 खालील प्रक्रियांसाठी (process) ऊष्मागतिकीच्या पहिल्या नियमाचे गणिती सूत्र लिहा. (अ) समआयतनी (isochoric) प्रक्रिया (ब) समोष्ण (adiabatic) प्रक्रिया
    Read the model answer
  8. Q. 10 लॅन्थेनॉईड आणि ॲक्टिनॉईडमधील दोन समानता आणि दोन फरक किंवा भेद लिहा.
    Read the model answer
  9. Q. 11 खालील अभिकारकांची क्लोरोबेन्झीनवर काय क्रिया होते? (i) संहत HNO3 (ii) वाफाळलेले H2SO4
    Read the model answer
  10. Q. 12 कॅन्निझारोची अभिक्रिया योग्य उदाहरणासह स्पष्ट करा.
    Read the model answer
  11. Q. 13 एक रासायनिक अभिक्रिया दोन टप्प्यात घडते: (i) NO2Cl(g) → (सावकाश) → NO2(g) + Cl(g) (ii) NO2Cl(g) + Cl(g) → (जलद) → NO2(g) + Cl2(g) (अ) यावरून दर नियमाचे (rate law) समीकरण लिहा. (ब) अभिक्रियेतील माध्यमिक द्रव्य (intermediate) ओळखा.
    Read the model answer
  12. Q. 14 Cu^(++) (0.02 M) | Cu(s) या इलेक्ट्रोडचे प्रमाणित विभव 0.337 volt आहे. त्याच्या विभवाचे व्होल्टमध्ये गणन करा.
    Read the model answer

Section C: विभाग क: खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्न सोडवा (24 marks)

  1. Q. 15 (i) बाष्पदाबातील सापेक्ष घट आणि अबाष्पशील द्राव्य पदार्थाचे रेण्वीय वस्तुमान यातील संबंध व्युत्पन्न करा. (ii) ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमाचे विधान लिहा.
    Read the model answer
  2. Q. 16 (i) ॲसिटामाईडचे इथिल अमाईनमध्ये रूपांतर करा. (ii) पाण्याचे उभयधर्मी स्वरूप स्पष्ट करा.
    Read the model answer
  3. Q. 17 खालील रूपांतरे घडवा: (i) इथेनॉलचे सोडियम इथॉक्साईडमध्ये (ii) फेनॉलचे o-फेनॉल सल्फॉनिक आम्लामध्ये (iii) ब्रोमोमिथेनचे मिथॉक्सी इथेनमध्ये
    Read the model answer
  4. Q. 18 (i) पेप्टाईड बंधन म्हणजे काय? (ii) आंतरहॅलोजन संयुगांची सर्वसामान्य वैशिष्ट्ये (characteristics) लिहा.
    Read the model answer
  5. Q. 19 (i) क्रोमिअम (Z = 24) चे निरीक्षित इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. (ii) स्पिन ओनली सूत्र (spin only formula) वापरून Ti^(3+) च्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) गणन करा. (Ti साठी Z = 22) (iii) व्याख्या लिहा: हरित रसायनशास्त्र
    Read the model answer
  6. Q. 20 (i) जीवशास्त्रातील सहबद्ध धातू जटिल रचनेची उदाहरणे लिहा. (ii) 298 K तापमानास 2 मोल्स SO2 चे ऑक्सिडीकरण झाल्यास होणाऱ्या कार्याचे गणन करा. जर, SO2(g) + (1/2) O2(g) → SO3(g) (दिलेली गोष्ट: R = 8.314 J/K/mol)
    Read the model answer
  7. Q. 21 (i) हरित रसायनशास्त्रानुसार अणु अर्थशास्त्राची टक्केवारीसाठी (% atom economy) सूत्र लिहा. (ii) रूपांतर करा: (अ) बेन्झीनचे बेन्झाअल्डीहाईडमध्ये (ब) सायक्लोहेक्झीनचे ॲडीपिक आम्लामध्ये
    Read the model answer
  8. Q. 22 (i) नायलॉन-6 तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी अभिक्रिया लिहा. (ii) Sc^(3+) आयनचे क्षार रंगहीन स्वरूपाचे तर Mn^(3+) आयनचे क्षार रंगीत स्वरूपाचे असतात स्पष्ट करा. (Sc साठी Z = 21 आणि Mn साठी Z = 25)
    Read the model answer
  9. Q. 23 (i) सहबद्ध संयुगांसाठी वर्नरच्या तत्त्वप्रणालीची (Werner's theory) आधारतत्त्वे (postulates) लिहा. (ii) इथेन-1,2-डायओलची ॲसिटोनवर काय क्रिया होते?
    Read the model answer
  10. Q. 24 (i) ॲसिटाल्डीहाईडसाठी टोलेन्सच्या अभिकारकाची चाचणी लिहा. (ii) सल्फॅनिलिक आम्लाच्या झ्विटर (zwitter) आयनचे रचनासूत्र काढा. अल्कलाईन द्रावणात बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईड आणि फेनॉल यामधील अभिक्रिया लिहा.
    Read the model answer
  11. Q. 25 (i) व्याख्या लिहा: समान आयनचा परिणाम (ii) स्टार्चपासून ग्लुकोज (glucose) कसे तयार करतात ते लिहा.
    Read the model answer
  12. Q. 26 (i) ॲसिटाअल्डीहाईडच्या 2,4-डायनायट्रोफेनिल हायड्राझोनचे रचनासूत्र काढा. (ii) A + B → P या अभिक्रियेचा दर [A] = 0.2 M आणि [B] = 0.1 M असतांना 3.6 × 10^(−2) mol/dm³/s आहे. जर अभिक्रिया B साठी प्रथम वर्ग आणि A साठी द्वितीय वर्ग असल्यास अभिक्रियेच्या दर स्थिरांकाचे गणन करा.
    Read the model answer

Section D: विभाग ड: खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा (12 marks)

  1. Q. 27 (i) व्याख्या लिहा: (अ) समपरासरणी (isotonic) द्रावण (ब) अभिक्रियेची रेण्वीयता (molecularity) (ii) हेसचा स्थिर उष्णता समुच्चयाचा नियम सांगा आणि स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. Q. 28 (i) व्याख्या लिहा: (अ) शॉट्कीच्या परिणाम (Schottky defect) (ब) फेरोचुंबकीयत्व (ferromagnetism) (ii) HDP तयार करताना वापरलेल्या उत्प्रेरकाचे नाव लिहा. (iii) नैसर्गिक रबराच्या आयसोप्रिन (isoprene) एककाचे रचनासूत्र बनवा.
    Read the model answer
  3. Q. 29 (i) [Fe(CN)6]^(4−) मधील Fe^(2+) साठी प्रभावी अणुअंकाचे गणन करा. (Z = 26) (ii) शिशाच्या विद्युत संचायक घटाची सुबक आणि नामनिर्देशित आकृती काढा. (iii) हायड्रोजन ऑक्सिजन इंधन घटाचे दोन फायदे लिहा.
    Read the model answer
  4. Q. 30 (i) रूपांतर करा: इथेनॉईक आम्लाचे इथेनॉलमध्ये (ii) ब्रोमोमिथेनसाठी अल्कधर्मी जलविच्छेदन अभियांत्रिकी (mechanism) स्पष्ट करा.
    Read the model answer
  5. Q. 31 (i) ॲसिटीक आम्ल त्याच्या डेसिमोलर द्रावणात 5% आयनित (ionised) होते यावरून ॲसिटीक आम्लाच्या विचरण स्थिरांकाचे (dissociation constant) गणन करा. (ii) एप्सम क्षाराचे (epsom salt) रासायनिक सूत्र लिहा. H2SO4 चे दोन उपयोग लिहा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!