munotes®

HSC Book-Keeping and Accountancy March 2025 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

HSC-Book-Keeping-and-Accountancy-March-2025-Marathi-Medium.pdf
Board paper J-348 · 12 pages · 2.7 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 14 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 खालील सर्व उपप्रश्न सोडवा (20 marks)

  1. (A) योग्य पर्यायांची निवड करून विधाने पुन्हा लिहा :
    • (1) … ही अदृश्य संपत्ती आहे. (अ) ख्याती (ब) स्कंध (क) रोख (ड) उपस्कर
    • (2) 'नफा न कमविणाऱ्या' संस्थेच्या खात्यासाठी उत्पन्नाच्या खर्चावरील अधिक्यास … असे म्हणतात. (अ) तूट (ब) नफा (क) वाढावा (ड) तोटा
    • (3) संपत्तीच्या मूल्यात घट होते तेव्हा नफा-तोटा समायोजन खाते … केले जाते. (अ) नावे (Debited) (ब) जमा (Credited) (क) अधिक (ड) समान
    • (4) विसर्जन खर्च हा … खात्याला जमा केला जातो. (अ) रोखीकरण (ब) रोख / बँक (क) भांडवल (ड) कर्ज
    • (5) नोंदणी अधिकारी हा … असतो. (अ) सरकारी अधिकारी (ब) आहर्ता (क) आदाता (ड) पृष्ठांकिती
    Read the model answer
  2. (B) खालील वाक्य पूर्ण करा :
    • (1) व्यापार खाते … खर्चाच्या आधारे तयार केले जाते.
    • (2) उत्पन्न-खर्चाचे खाते हे … खाते आहे.
    • (3) मृत भागीदाराच्या वारसाचे खाते ताळेबंदात … बाजूला दाखविले जाते.
    • (4) कायम ठेव (fixed deposit) खाते … या गटात मोडते.
    • (5) जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली असेल तर … खाते नावे होते.
    Read the model answer
  3. (C) गटात न बसणारा शब्द ओळखा :
    • (1) मजुरी खाते, वेतन खाते, अधिकार शुल्क खाते, आयात शुल्क खाते
    • (2) यंत्र खाते, उपस्कर खाते, संगणक खाते, भाडे खाते
    • (3) सामान्य निधी खाते, धनको खाते, यंत्र खाते, भांडवल खाते
    • (4) नोंदणी अधिकारी, आहर्ता, आहार्यी, आदाता
    • (5) दर्शनी मूल्यावर, अधिमूल्यावर, कसरीवर, कर्जावर
    Read the model answer
  4. (D) खालील विधानांशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते सांगा :
    • (1) भागीदारी संस्था ही व्यापारी संस्था आहे.
    • (2) नफा न मिळविणे हा 'नफा न कमविणाऱ्या संस्थेचा' हेतू होय.
    • (3) निवृत्त भागीदाराला व्यवसायातून बाहेर जाणारा भागीदार (outgoing partner) असेही म्हणतात.
    • (4) नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी लाभाचे प्रमाण काढले जाते.
    • (5) वित्तीय विवरणात केवळ ताळेबंदाचा समावेश होतो.
    Read the model answer

Q. 2 (10 marks)

  1. श्री दीपक आणि श्री अभिषेक एक भागीदारीत 3 : 1 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत. 31 मार्च 2019 रोजी त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: भांडवल खाती : श्री दीपक ₹ 1,20,000, श्री अभिषेक ₹ 40,000; सामान्य निधी ₹ 16,000; विविध धनको ₹ 80,000; अधिकोष अधिविकर्ष ₹ 42,000; एकूण ₹ 2,98,000. संपत्ती: जमीन व इमारत ₹ 32,000; यंत्र व संयंत्र ₹ 60,000; फर्निचर ₹ 22,000; स्कंध ₹ 40,000; विविध ऋणको ₹ 64,000; रोख ₹ 80,000; एकूण ₹ 2,98,000. 1 एप्रिल 2019 रोजी आदिनाथला खालील अटींवर भागीदारीत प्रवेश दिला :
    • (1) त्याने भांडवल ₹ 40,000 आणि ख्याती ₹ 20,000 आणावे त्यासाठी त्याला भविष्यातील नफ्यात 1/5 हिस्सा मिळेल.
    • (2) फर्निचर वर 20% घसारा आकारावा.
    • (3) स्कंधाचे मूल्य 10% ने वाढवावे.
    • (4) इमारतीचे मूल्य 5% ने वाढवावे.
    • (5) विविध ऋणकोवर 5% दराने संशयित बुडीत कर्ज निधीची तरतूद करावी.
    • (6) सर्व भागीदारांचे भांडवल खाते त्यांच्या नवीन नफा-तोटा विभाजनाच्या प्रमाणात रोखीच्या खात्याच्या माध्यमातून समायोजित करावी. तयार करा : (अ) पुनर्मूल्यांकन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) संस्थेचा नवीन ताळेबंद
    Read the model answer
  2. OR आदित्य, अजिंक्य आणि अरुण हे भागीदार असून ते 5 : 3 : 2 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. 31 मार्च 2020 रोजीचा त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहे. देयता: धनको ₹ 10,450; राखीव निधी ₹ 7,500; भांडवल खाती : आदित्य ₹ 21,000, अजिंक्य ₹ 18,500, अरुण ₹ 16,600; एकूण ₹ 74,050. संपत्ती: रोख ₹ 3,800; ऋणको ₹ 9,000; स्कंध ₹ 8,750; यंत्र ₹ 50,000; उपस्कर ₹ 2,500; एकूण ₹ 74,050. 1 एप्रिल 2020 रोजी अरुण पुढील अटींवर भागीदारीतून निवृत्त झाला :
    • (1) संस्थेच्या पुस्तकात ख्यातीचे मूल्य ₹ 10,000 लावावे.
    • (2) स्कंधाचे मूल्य 10%, उपस्काराचे 5% ने आणि यंत्राचे मूल्य 10% ने कमी करावे.
    • (3) ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधी निर्माण करा.
    • (4) धनकोंच्या राशी मधून ₹ 100 चे अपलेखन (written off) करण्यात यावे.
    • (5) अरुणला देय असलेली सर्व राशी त्याच्या कर्ज खात्याला वर्ग करावी. तयार करा : (अ) नफा-तोटा समायोजन खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) नवीन संस्थेचा ताळेबंद
    Read the model answer

Q. 3 (10 marks)

  1. शर्मिला, उर्मिला आणि लीला हे 'जीवन स्टोअर्स' या संस्थेचे भागीदार आहेत. ते अनुक्रमे 2 : 2 : 1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात, त्यांनी 31 मार्च 2020 रोजी भागीदारी संस्था विसर्जित करण्याचे ठरविले. त्यांच्या भागीदारीचा त्याच दिवसाचा ताळेबंद खालील प्रमाणे होता. देयता: भांडवल खाती : शर्मिला ₹ 2,27,160, उर्मिला ₹ 1,44,000, लीला ₹ 1,08,000; धनको ₹ 28,800; देय विपत्रे ₹ 21,600; एकूण ₹ 5,29,560. संपत्ती: ख्याती ₹ 45,600; यंत्र ₹ 73,000; मोटारगाडी ₹ 1,67,600; इमारत ₹ 1,02,000; गुंतवणूक ₹ 62,400; ऋणको ₹ 30,600; स्कंध ₹ 45,000; बँक ₹ 3,360; एकूण ₹ 5,29,560. वरील तारखेला संस्थेचे विसर्जन झाले आणि संपत्तीचे रोखीकरण पुढील प्रमाणे करण्यात आले.
    • (1) शर्मिलाने इमारत ₹ 1,23,600 ला ठेवून घेतली.
    • (2) उर्मिलाने ख्याती, स्कंध आणि ऋणको पुस्तकी मूल्याला ठेवून घेतले आणि धनको व देय विपत्राचे शोधन करण्याचे मान्य केले.
    • (3) मोटारगाडी आणि यंत्राचे अनुक्रमे ₹ 1,51,080, ₹ 31,680 या मूल्याला रोखीकरण झाले.
    • (4) लीलाने गुंतवणूक ₹ 55,440 ला ठेवून घेतली.
    • (5) रोखीकरण खर्च ₹ 6,800 आला. तयार करा : (अ) रोखीकरण खाते (ब) भागीदारांचे भांडवल खाते (क) बँक खाते
    Read the model answer
  2. OR कनिकाला मानसीचे ₹ 26,000 देणे होते. मानसीने कनिकावर 3 महिने मुदतीचे ₹ 21,000 चे विपत्र काढले आणि शेष रकमेचा ₹ 5,000 चा रेखांकित धनादेश मिळाला. विपत्र स्वीकारून मानसीकडे पाठविले. त्याच दिवशी मानसीने कनिकाचे विपत्र बन्सरीला पृष्ठांकित केले. देय दिनांकाला बन्सरीने मानसीला विपत्र अनादरीत झाल्याचे व नोंदणी खर्च ₹ 280 केल्याचे कळविले. नंतर मानसीने कनिकावर 1 महिना मुदतीचे नवीन विपत्र ज्यात नोंदणी खर्च व व्याज ₹ 650 समाविष्ट करून काढले. देय दिनांकाला धनादेशाद्वारे कनिकाने स्वीकृत विपत्राचे शोधन केले. तयार करा : (अ) मानसीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी द्या. (ब) कनिकाच्या पुस्तकात मानसीचे खाते.
    Read the model answer

Q. 4 (8 marks)

  1. परिमल कंपनी लि. ने प्रत्येकी ₹ 20 मूल्य असलेले 1,00,000 पूर्वाधिकार भागांचे निर्गमन केले. त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे : अर्जासोबत ₹ 8; आवंटनावर ₹ 6; प्रथम याचना ₹ 4; अंतिम याचना ₹ 2. कंपनीला सर्व भागांकरिता अर्ज प्राप्त झाले आणि सर्व रकमा मिळाल्या. परिमल कंपनी लि. च्या पुस्तकात आवश्यक रोजकीर्द नोंदी द्या.
    Read the model answer
  2. OR संगणकीय लेखांकन प्रणालीचे (CAS) महत्त्व स्पष्ट करा.
    Read the model answer

Q. 5 (8 marks)

  1. महेंद्र, सुरेंद्र आणि नरेंद्र हे भागीदार आहेत. ते नफा-तोटा 5 : 3 : 2 प्रमाणात विभागून घेतात. त्यांचा 31 मार्च 2019 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे. देयता: भांडवल खाती : महेंद्र ₹ 23,000, सुरेंद्र ₹ 15,000, नरेंद्र ₹ 12,000; देय विपत्र ₹ 2,000; धनको ₹ 8,000; बँक कर्ज ₹ 12,000; सामान्य निधी ₹ 16,000; एकूण ₹ 88,000. संपत्ती: स्कंध ₹ 17,000; उपस्कर ₹ 18,000; जमीन व इमारत ₹ 16,000; बँक ₹ 37,000; एकूण ₹ 88,000. दिनांक 30 जून, 2019 रोजी नरेंद्र मृत झाला आणि भागीदारीच्या करारानुसार खालील समायोजन करण्याचा निर्णय घेतला.
    • (1) स्कंध, उपस्कर, जमीन व इमारतीचे पुनर्मूल्यांकन अनुक्रमे ₹ 16,700, ₹ 16,200, ₹ 30,100 ला करण्यात आले.
    • (2) संस्थेची ख्याती मागील चार वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 3 पट ठरविण्यात यावी आणि ख्यातीतील नरेंद्रचा हिस्सा ठरविण्यात यावा. मागील चार वर्षाचा नफा : 1 ले वर्ष ₹ 30,000; 2 रे वर्ष ₹ 25,000; 3 रे वर्ष ₹ 25,000; 4 थे वर्ष ₹ 40,000.
    • (3) नरेंद्रचा नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्याच्या आधारे त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत देण्यात यावा.
    • (4) नरेंद्रला ₹ 1,200 प्रमाणे दर महा वेतन दिले जात होते.
    • (5) भांडवलावर वार्षिक 10% दराने व्याज देण्याची तरतूद आहे.
    • (6) नरेंद्रच्या मृत्यूपर्यंतची त्याची उचल दरमहा ₹ 900 होती. तयार करा : (अ) नरेंद्रचे भांडवल खाते. ते त्याच्या वारसाला दिल्या जाणाऱ्या रकमेने दाखवा. (ब) कृती कार्य दर्शवा (working notes) : (i) नरेंद्रचा ख्याती मधील हिस्सा (ii) नरेंद्रला त्याच्या हिश्श्याचा देय असलेला नफा
    Read the model answer
  2. OR दोन्ही भाग सोडवा :
    • (अ) खालील माहितीवरून चलअनुपाताची गणना करा. (i) एकूण संपत्ती = ₹ 22,000 (ii) स्थिर संपत्ती = ₹ 10,000 (iii) विनियोजित भांडवल = ₹ 20,000 (4)
    • (ब) खालील माहितीच्या आधारे शुद्ध लाभ अनुपाताची गणना करा. (i) विक्री = ₹ 76,000 (ii) विक्री मालाची मूळ किंमत = ₹ 52,000 (iii) अप्रत्यक्ष खर्च = ₹ 12,000 (4)
    Read the model answer

Q. 6 (12 marks)

  1. भानुबाई महिला सेवा केंद्राचा 1 एप्रिल, 2019 रोजीचा ताळेबंद आणि 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे प्राप्ती आणि शोधन खाते खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. ताळेबंद पत्रक 1 एप्रिल, 2019 रोजीचा. देयता: भांडवल निधी ₹ 40,000; अदत्त खर्च : मजुरी ₹ 8,000, विद्युत ₹ 7,000, स्टेशनरी ₹ 1,000; एकूण ₹ 56,000. संपत्ती: यंत्र ₹ 10,000; उपस्कर ₹ 20,000; सरकारी रोखे ₹ 6,500; अप्राप्त वर्गणी ₹ 8,500; बँकेतील रोख ₹ 10,000; हस्तस्थ रोख ₹ 1,000; एकूण ₹ 56,000. प्राप्ती आणि शोधन खाते 31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. प्राप्ती: शिल्लक पुढे आणली : हस्तस्थ रोख ₹ 1,000, बँकेतील रोख ₹ 10,000; वर्गणी : 2018-19 ₹ 2,000, 2019-20 ₹ 45,000, 2020-21 ₹ 3,000 (₹ 50,000); प्रवेश शुल्क ₹ 28,000; इतर प्राप्ती ₹ 5,000; एकूण ₹ 94,000. शोधन: विद्युत खर्च ₹ 25,000; मजुरी ₹ 22,000; लेखन सामग्री ₹ 3,000; भाडे आणि कर ₹ 11,800; प्रवास खर्च ₹ 8,000; शिल्लक पुढे नेली : हस्तस्थ रोख ₹ 4,000, बँकेतील रोख ₹ 20,200; एकूण ₹ 94,000. अतिरिक्त माहिती :
    • (1) मजुरीचे ₹ 450 देणे आहेत.
    • (2) प्रवेश शुल्काचे भांडवलीकरण करा.
    • (3) उपस्करावर वार्षिक 10% दराने घसारा आकारा.
    • (4) वर्ष 2019-20 च्या वर्गणीचे ₹ 3,000 येणे बाकी आहेत. तयार करा : (अ) 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे उत्पन्न खर्च खाते (ब) 31 मार्च 2020 रोजीचे ताळेबंद.
    Read the model answer

Q. 7 (12 marks)

  1. राजन आणि रोहित समान प्रमाणात नफा-तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. खालील माहितीच्या आधारे 31 मार्च, 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता नफा-तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करा : परीक्षा सूची 31 मार्च, 2020 रोजीची. नावे शिल्लक: विमा ₹ 30,000; जमीन आणि इमारत ₹ 1,00,000 [1 जुलै, 2019 रोजी ₹ 40,000 ची वाढ]; वेतन ₹ 10,000; निर्यात कर ₹ 5,000; व्याज ₹ 2,000; उपस्कर ₹ 80,000; ऋणको ₹ 52,000; एकूण ₹ 2,79,000. जमा शिल्लक: भांडवल खाती : राजन ₹ 1,00,000, रोहित ₹ 1,00,000; 10% बँक कर्ज [1 ऑक्टोबर 2019 रोजी घेतले] ₹ 60,000; देय विपत्र ₹ 19,000; एकूण ₹ 2,79,000. अतिरिक्त माहिती :
    • (1) ढोबळ नफा ₹ 69,000.
    • (2) विमा 1 एप्रिल 2019 पासून 15 महिन्याकरिता दिला आहे.
    • (3) जमीन व इमारतीवर वार्षिक 10% दराने तसेच उपस्करावर वार्षिक 5% दराने घसारा आकारा.
    • (4) बुडीत कर्ज ₹ 2,000 अपलेखित करून विविध ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा.
    • (5) संवरण स्कंधाचे मूल्य ₹ 69,000.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
HSC (Class 12) · 201 papers
Browse all →
Issue
Done!