munotes®

SSC Mathematics Part II (Geometry) July 2024 Question Paper (Marathi Medium) - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

SSC-Mathematics-Part-II-Geometry-July-2024-Marathi-Medium.pdf
Board paper N-398 · 11 pages · 2.3 MB

Loading PDF...

Questions asked in this paper

Solved paper All 21 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 (8 marks)

  1. (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा :
    • (1) जर △ABC व △PQR मध्ये शिरोबिंदूंच्या एकास-एक संगतीत AB/QR = BC/PR = CA/PQ तर खालीलपैकी सत्य विधान … आहे. (A) △PQR ~ △ABC (B) △PQR ~ △CAB (C) △CBA ~ △PQR (D) △BCA ~ △PQR
    • (2) दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी, 3.3 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर … आहे. (A) 4.4 सेमी (B) 8.8 सेमी (C) 2.2 सेमी (D) 8.3 सेमी
    • (3) रेख AB हा Y-अक्षाला समांतर असून बिंदू A चे निर्देशक (1, 3) आहेत, तर बिंदू B चे निर्देशक … आहेत. (A) (3, 1) (B) (5, 3) (C) (3, 0) (D) (1, −3)
    • (4) 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ … आहे. (A) 1000 घसेमी (B) 100 घसेमी (C) 10,000 घसेमी (D) 10 घसेमी
    Read the model answer
  2. (B) खालील उपप्रश्न सोडवा :
    • (1) △ABC मध्ये, ∠B = 90°, ∠C = 30°, AC = 12 सेमी, तर बाजू AB ची किंमत काढा.
    • (2) वरील आकृतीमध्ये, m(कंस MN) = 70°, तर ∠MLN चे माप किती ?
    • (3) किंमत काढा : sin θ × cosec θ.
    • (4) जर वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आणि वर्तुळकंसाची लांबी 10 सेमी असेल, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
    Read the model answer

Q. 2 (A) खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणत्याही दोन) : (4 marks)

  1. (1) वरील आकृतीमध्ये, जीवा PQ आणि जीवा RS एकमेकीस बिंदू T मध्ये छेदतात. तर : ∠STQ = (1/2)[m(कंस SQ) + m(कंस PR)] हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
    Read the model answer
  2. (2) जर sec θ = 25/7, तर tan θ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer
  3. (3) एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंब उंची 6 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer

Q. 2 (B) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही चार) : (8 marks)

  1. (1) केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
    Read the model answer
  2. (2) △PQR मध्ये, रेख RS हा ∠PRQ चा दुभाजक आहे. जर PR = 15, RQ = 20, PS = 12, तर SQ काढा.
    Read the model answer
  3. (3) एक गोलाचा व्यास 14 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.
    Read the model answer
  4. (4) वरील आकृतीमध्ये, ∠PQR = 90°, रेख QN ⊥ रेख PR, PN = 9, NR = 16, तर QN काढा.
    Read the model answer
  5. (5) A(3, 3) आणि B(5, 7) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
    Read the model answer

Q. 3 (A) खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणतीही एक) : (3 marks)

  1. (1) दिलेल्या आकृतीत AB ∥ CD ∥ EF. जर AC = 12, CE = 9, BD = 8, तर DF काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer
  2. (2) एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 21 सेमी आहे. तर वृत्तचितीचे घनफळ व तळाचा परीघ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
    Read the model answer

Q. 3 (B) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : (6 marks)

  1. (1) सिद्ध करा, 'चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात'.
    Read the model answer
  2. (2) केंद्र P व 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 8 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
    Read the model answer
  3. (3) P(−2, 3), Q(1, 2), R(4, 1) हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा.
    Read the model answer
  4. (4) जर △PQR ~ △LMN, 9 × A(△PQR) = 16 × A(△LMN) व QR = 20, तर MN काढा.
    Read the model answer

Q. 4 खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन) : (8 marks)

  1. (1) △ABC हा समभुज त्रिकोण आहे. बिंदू D हा बाजू BC वर अशाप्रकारे आहे की BD = (1/5)BC, तर सिद्ध करा की AD²/AB² = 21/25.
    Read the model answer
  2. (2) △LMN ~ △LQP, △LMN मध्ये LM = 3.6 सेमी, ∠L = 50°, LN = 4.2 सेमी आणि LM/LQ = 4/7, तर △LQP काढा.
    Read the model answer
  3. (3) नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता 60° मापाचा उन्नतकोन होतो. त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 24 मी. अंतर मागे जाऊन पुन्हा झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता 30° मापाचा उन्नतकोन होतो, तर नदीपात्राची रुंदी आणि झाडाची उंची काढा. (√3 = 1.73)
    Read the model answer

Q. 5 खालील उपप्रश्न सोडवा (कोणताही एक) : (3 marks)

  1. (1) एका वर्तुळाकार बागेचा व्यास 13 मीटर असून बागेच्या दोन प्रवेशद्वारामधील अंतर 13 मीटर आहे. बागेच्या परिघावर एक विद्युत खांब असा उभा करावयाचा आहे, जेणे करून प्रत्येक प्रवेशद्वारापासून व खांबापर्यंतच्या अंतरातील फरक 7 मीटर असेल. असा खांब उभा करता येईल का ? येत असल्यास खांबाचे दोन्ही प्रवेशद्वारापासूनचे अंतर काढा.
    Read the model answer
  2. (2) x − 6y + 11 = 0 ही रेषा (8, −1) आणि (0, k) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला दुभागते, तर k ची किंमत काढा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
SSC (Class 10) · 130 papers
Browse all →
Issue
Done!