munotes®

SSC Marathi (First Language) March 2024 Question Paper - Maharashtra Board

Source: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune (mahahsscboard.in)

SSC-Marathi-First-Language-March-2024.pdf
Board paper N-501 · 17 pages · 4.0 MB

Loading PDF...

Older exam None: this is the earliest we hold
Newer exam July 2024 Board exam · Marathi (First Language) →

Questions asked in this paper

Solved paper All 18 questions answered in full Exam-ready answers, every step written out the way the board marks it. Open the solutions

Q. 1 विभाग-1 : गद्य (18 marks)

  1. (A) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (उतारा "शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे," पासून "श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो." पर्यंत.)
    • (1) उत्तरे लिहा : (i) म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - (ii) आपल्या तरुण मुलाला 'माणसं' दाखवणारा -
    • (2) आकृती पूर्ण करा : वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना (चार रिकाम्या जागा)
    • (3) स्वमत : 'वाट पाहणं' ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
    Read the model answer
  2. (B) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (उतारा "झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे;" पासून "पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं." पर्यंत.)
    • (1) कृती पूर्ण करा : सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये (दोन चौकटी)
    • (2) कोण ते लिहा : (i) सोनालीवर ताईगिरी करणारी - (ii) झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी -
    • (3) स्वमत : सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
    Read the model answer
  3. (C) अपठित गद्य. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (उतारा "मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ ?" पासून "तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल." पर्यंत.)
    • (1) आकृतिबंध पूर्ण करा : आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी (चार चौकटी)
    • (2) कधी ते लिहा : (i) आई कावरीबावरी होते - (ii) आई थकणार नाही -
    Read the model answer

Q. 2 विभाग-2 : पद्य (16 marks)

  1. (A) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (कविता "तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं." पासून "चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय." पर्यंत.)
    • (1) (अ) चौकटी पूर्ण करा : (i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - (ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे -
    • (2) आकृतिबंध पूर्ण करा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य (चार चौकटी)
    • (3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास
    • (4) काव्यसौंदर्य : 'आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत बिगूल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय'. या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
    Read the model answer
  2. (B) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र
    • (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री
    • (ii) प्रस्तुत कवितेचा विषय
    • (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे
    Read the model answer
  3. (C) खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा : 'वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात'.
    Read the model answer

Q. 3 विभाग-3 : स्थूलवाचन (6 marks)

  1. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
    • (1) 'माणसे पेरा। माणुसकी उगवेल' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
    • (2) 'पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
    • (3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.
    Read the model answer

Q. 4 विभाग-4 : भाषाभ्यास (16 marks)

  1. (A) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
    • (1) समास : योग्य जोड्या लावा : सामासिक शब्द (i) त्रिभुवन (ii) पुरुषोत्तम; समासाचे नाव : कर्मधारय समास, द्विगू समास, इतरेतर द्वंद्व समास.
    • (2) शब्दसिद्धी : खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा : (बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट) तक्त्याचे स्तंभ : प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द, अभ्यस्त शब्द.
    • (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (i) कंठस्नान घालणे (ii) हुकमत गाजवणे (iii) व्यथित होणे (iv) आनंद गगनात न मावणे.
    Read the model answer
  2. (B) भाषिक घटकांवर आधारित कृती :
    • (1) शब्दसंपत्ती : (1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (i) मार्ग = (ii) जल =. (2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (i) सुपीक × (ii) ज्ञानी ×. (3) खालील शब्दांचे वचन बदला : (i) भिंती (ii) रस्ता. (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : रखवालदार
    • (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) : (i) महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती. (ii) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात. (iii) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे. (iv) शनीवारी दूपारी साडेबाराची वेळ होती.
    • (3) खालील विरामचिन्हे ओळखा : (i) , (ii) " "
    • (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (i) Tax (ii) Exhibition
    Read the model answer

Q. 5 (A) विभाग-5 : उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा : (6 marks)

  1. (I) (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा : वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. निवेदन : 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे'. आम्रपाली रोपवाटिका, यशवंतनगर, सांगली. एक सुंदर उपक्रम व स्पर्धा. वेळ : सकाळी ९ ते सायं ५. रोपे वाटप : १५ जून ते २० जून. फक्त शालेय संस्थांसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप. सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस. संपर्क : व्यवस्थापक, Email-amrapali06@gmail.com. मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने.
    Read the model answer
  2. (II) किंवा : उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
    Read the model answer
  3. (III) किंवा (2) : विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
    Read the model answer

Q. 5 (B) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 marks)

  1. (I) (1) जाहिरातलेखन : संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
    Read the model answer
  2. (II) (2) बातमीलेखन : खालील विषयावर बातमी तयार करा : 'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
    Read the model answer
  3. (III) (3) कथालेखन : खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा : (दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.) कथा : शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि…
    Read the model answer

Q. 5 (C) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 marks)

  1. (I) (1) प्रसंगलेखन : साधना विद्यालय, धुळे. इयत्ता दहावी-शुभेच्छा समारंभ. दि. ४ फेब्रुवारी, स. १० वाजता. अध्यक्ष : श्री. रमाकांत धुमाळ. प्रमुख पाहुणे : श्री. अजय साठे. वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
    Read the model answer
  2. (II) (2) आत्मकथन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. (चौकटीत : आरसा; मुद्दे : शोध/निर्मिती, आनंदाचे क्षण, गरज व महत्त्व, खंत)
    Read the model answer
  3. (III) (3) वैचारिक लेखन : 'जलप्रदूषण-समस्या व उपाय' या विषयावर तुमचे विचार लिहा.
    Read the model answer

Typed from the board's paper above. The paper is the original. Where it prints an activity with boxes to fill, the task is typed here and the model answer writes the activity out.

Quick Help

No. The full paper opens straight away, with no login and nothing to pay.
From the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. It is the paper the Board published on mahahsscboard.in, unchanged, reproduced with the Board's permission.
Connected Papers
SSC (Class 10) · 130 papers
Browse all →
Issue
Done!